आनंदी नाताळ-ख्रिसमस-कविता-4

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 12:03:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                आनंदी "नाताळ-ख्रिसमस"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २५.१२.२०२२, रविवार, नाताळचा पावन दिवस आहे. जोसेफ आणि मेरी यांचा सुपुत्र, देवाचा प्रेषित प्रभू येशू याचा जन्म दिवस. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहिणींना, "नाताळ-ख्रिसमस" -च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ऐकुया नाताळाच्या काही आनंदी कविता-

                                      "मी कोण ?"
                                     ------------

पंख आहेत मला छान
आहे तुमची आवडती
सिंड्रेलाच्या गोष्टीतली
सांगा बरं मी कोण ?

नाताळ आला की मी येतो
तुमच्यासाठी खाऊ आणतो
पांढरी पांढरी मोठी माझी दाढी
गाठोड्यातून मी छान वस्तू काढी
सांगा बरं मी कोण ?

ढोलकपूरचा मी आहे हिरो
भल्याभल्यांना बनवतो झिरो
खातो टूणटूण मावशीचे लाडू स्वादिष्ट
करतो वाईट अन दुष्ट गोष्टींना नष्ट
सांगा बरं मी कोण ?

घडता पापांचा घडा फार
पापोमीटर वाजतो जोरदार
घडवतो पापी लोकांना अद्दल
लढवून नवनवीन शक्कल
सांगा बरं मी कोण ?

मुलांना मी फार आवडते
चवीला मी गोडगोड लागते
माझ्यामुळे दात किडतात फार
आरोपाचा या माझ्यावर भार
सांगा बरं मी कोण ?

--मिताली तांबे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.