आनंदी नाताळ-ख्रिसमस-शुभेच्छा-संदेश-1

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 12:09:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                आनंदी "नाताळ-ख्रिसमस"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २५.१२.२०२२, रविवार, नाताळचा पावन दिवस आहे. जोसेफ आणि मेरी यांचा सुपुत्र, देवाचा प्रेषित प्रभू येशू याचा जन्म दिवस. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहिणींना, "नाताळ-ख्रिसमस"-च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ऐकुया नाताळाच्या काही आनंदी शुभेच्छा-संदेश-

     मेरी ख्रिसमस-ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा-

     ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रभु येशूचा जन्म झाला असे मानले जाते.  असे मानले जाते की देवाने आपल्या मुलाला पाप करण्यापासून वाचवण्यासाठी आणि रोखण्यासाठी पाठवले.  ख्रिसमसच्या निमित्ताने लोक ख्रिसमसच्या झाडाला सजवतात आणि चर्चमध्ये जातात.  त्याच वेळी, जगभरात खूप उत्साह, उत्साह आहे आणि लोक त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांना भेटतात आणि हा दिवस खास पद्धतीने साजरा करतात.  मुलांची प्रतीक्षा ख्रिसमसच्या दिवशीही संपते, कारण या दिवशी सांताक्लॉज मुलांसाठी भरपूर भेटवस्तू घेऊन येतात.  तुम्ही तुमच्या मित्रांना मेरी ख्रिसमस २०२१ च्या शुभेच्छा, मराठी मध्ये संदेश पाठवू शकता.

     ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो..मेरी ख्रिसमस!!

--जातीने ख्रिश्चन नसलो तर काय मनाने तर संता क्लोज आहे, मेरी ख्रिसमस

--या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

--नाताळ ची गोष्ट एकूण सुंदरसा बोध भेटला मला, सोडा आता मागचे पुढचे विचार आणि नाताळ दिवस तरी आनंदाने जगा, मेरी ख्रिसमस

--आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकाची माफी मागुया प्रभूकडे, मनात धल्या आशा सर्व सुखी राहू दे. प्रभूची कृपा दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे... नाताळच्या शुभेच्छा

--ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना... नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

--आला नाताळ सण, घेऊनी आनंद मनात, सर्व चुकांची माफी मागितली मनात, सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात, मदत हाच धर्म, गाणे गावे सुरात, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

--मराठी भाषण
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.