बरसून जाऊ दे

Started by Jai dait, August 27, 2010, 11:12:25 AM

Previous topic - Next topic

Jai dait

बरसून जाऊ दे तुझ्या डोळ्यांतला पाउस
हूर हूर मनाला लावून अशी नको जाउस
ओसरून जातील हे ही ढग दु:खाचे
पण चांदणे,  अशी तू उदास नको राहूस,

बघ खिडकीशी उभा हा खट्याळ वारा
सागर ही बघ सोडून त्याचा किनारा
तुला हसवण्या आला आसमंत सारा,
चल स्वागत कर त्यांचे, डोळे पूस,
चांदणे,  अशी तू उदास नको राहूस,

हिरमुसलेला तुझा हा अबोल चेहरा
कुठे गेला तुझा तो रंग हासरा?
खळाळू दे तुझ्या हास्याचा अवखळ झरा
आता आसवांचा  पूर नको वाहूस,
चांदणे,  अशी तू उदास नको राहूस,

    --जय

amoul




MK ADMIN

बघ खिडकीशी उभा हा खट्याळ वारा
सागर ही बघ सोडून त्याचा किनारा
तुला हसवण्या आला आसमंत सारा,
चल स्वागत कर त्यांचे, डोळे पूस,
चांदणे,  अशी तू उदास नको राहूस,

Awesome mitra.....  :)

aspradhan

हिरमुसलेला तुझा हा अबोल चेहरा
कुठे गेला तुझा तो रंग हासरा?
खळाळू दे तुझ्या हास्याचा अवखळ झरा
आता आसवांचा  पूर नको वाहूस,
चांदणे,  अशी तू उदास नको राहूस,
manacha vedh ghenari kaviata!! abhinandan

Prachi

sahiye....चांदणे,  अशी तू उदास नको राहूस,
mastach...


santoshi.world

tu jichyavar hi kavita kelis tiche mahit nahi pan hya kavitene mazya chehryavar kharach smile anali ......... thanks :) .......... khup avadali hi kavita ....... changle lihitos ...... keep it up