घास ???

Started by Ashok_rokade24, December 26, 2022, 03:31:46 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

कुणी कुणाचे पाप मोजतो ,
पाप शोधण्या कुणी रमतो ,
कोण मेले ते काय कुणाला,
कावळा नैवद्याचा भुकेला ॥

कुणी कुणाला अभय देतो
कुणी भयाने शरण जातो ,
भक्ती रसा विसरून कुणी ,
हाती घेतसे जहरी प्याला ॥

कुणी सत्ता घेऊन हसतो ,
सत्ते साठी कुणी झगडतो ,
खेळ त्याचाच संपून जाई ,
जो कुणाच्या विरोधात गेला॥

जात,धर्माची नित भांडणे ,
उद्योगाविन हातही सुने ,
महागाईने श्र्वास कोंडला,
कळप लांडग्यांचा जमला ॥

इथे सत्तेचा खेळ चालला ,
माणूस माणसा विसरला ,
तुंबडी आपलीच भरण्या  ,
घास माणसांचा हिरावला ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .