मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-50-ओज-शंकराची कहाणी-

Started by Atul Kaviraje, December 27, 2022, 09:21:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-50
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ओज-शंकराची कहाणी"

                                 ओज-शंकराची कहाणी--
                                ---------------------

त्यांच्या कामाचे वर्णन करणारे ओज-शंकराष्टक आपणास सादर करतो !

              ओज शंकरा--

तुझीच ओज-शंकरा, स्मृती मनात वाहतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ धृ ॥

प्रसार संघशक्तिचा, विचार भावला तुला ।
जगात आचरून प्रेममार्ग, पाय रोविला ॥
कसा मिळेल वारसा तुझा, विचार राहतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ १ ॥

कधी सुरेल बांसरी, 'प्रहार' तू प्रशिक्षिले ।
कुमार, बाल, वा युवा, तुवा पुरे खुळावले ॥
व्यक्ती, व्यक्ती, शिबीर-साक्ष, तेच दीस शोधतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ २ ॥

कसा, कुठे, कधी, कुणी, विचार प्रेरिला मनी ।
अपूर्व-पूर्व अंतरा[१] न थोर मानले जनी ॥
तुझेच शिष्य, चाहते, तुला मनात बाहतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ३ ॥

तळात कोकणातुनीहि नागभूमि[२] गाठली ।
एकात्मता धरून नेम देशभक्ति पेरिली ॥
मितेय, नाग, तांगखूल, मुंबईस जोडतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ४ ॥

ब्रम्हचर्यी कुणास काय प्राप्त होत संतती ।
तुला मुले अनेक, ती तुझेच नाव सांगती ॥
न पुत्र वागला कुणी, असाच निष्ठ राहतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ५ ॥

निवासती मुलेमुली, अशी गृहेहि राखली ।
मुलांस, पालकांस, ना मुळीच धास्ति वाटली ॥
जपेल पालकापरी, असे समाज मानतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ६ ॥

मराठमोळ, कानडी असोहि तेलुगू कुणी ।
मितेय, नाग, तांगखूल, शिष्य सर्वही गुणी ॥
तुम्हास लोभला, खचीत ध्येय शुद्ध गाठतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ७ ॥

असेच दीप दाखवू, अशीच रीत नांदवू ।
एकात्मता समस्त नागरिकांत खास जागवू ॥
पथावरून जाऊ त्याच, ब्रीद हेच सांगतो ।
समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ८ ॥

[१] मुंबई ते कोलकाता १,६६४ किमी अंतर, अधिक कोलकाता ते उख्रुल १,५७८ किमी अंतर, अधिक उख्रुल ते न्यू तुसॉम १०० किमी अंतर असे एकूण ३,३४२ किमी अंतर, भैय्याजींनी क्षुल्लक भासावे इतक्यांदा पार केले, इतक्यांदा शेकडो मुलांची तिथून इथवर ने-आण केली.

[२] कोकणातील कोंढ्ये गावातून ते थेट मणिपूर राज्यातील म्यानमारच्या सीमेवरील न्यू-तुसॉम गावात, शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या आपल्या ध्येयाच्या साधनेकरता, १९७१ साली रवाना झाले होते.

--नरेंद्र गोळे
(April 3, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.12.2022-मंगळवार.