मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-76-माझा आवडता ऋतू पावसाळा

Started by Atul Kaviraje, December 28, 2022, 09:25:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-76
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू पावसाळा"

     पावसाळा हा उन्हामुळे वाढलेल्या उष्णतेपासून सुटका करून थंडावा प्रदान करतो. दरवर्षी जून व जुलै महिन्यात पावसाचे आगमन होते. पावसाळा हा सुंदर ऋतु आहे माझा आवडता ऋतु देखील पावसाळा आहे. पाऊस पडायला लागला की लोकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. खासकरून शेतकाऱ्यामध्ये आनंदाची लाठ वाहू लागते.

     पावसाळा फक्त उष्णतेपासूनच मुक्ती देत नाही तर हा ऋतु शेतासाठी पण वरदान सिद्ध होतो. भारतात बऱ्याच शेतकऱ्याची शेती पावसावर अवलंबून आहे आणि जर चांगला पाऊस पडला नाही तर शेतात चांगले उत्पन्न येत नाही. ज्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला कमी किमतीत धान्य विकावे लागते. विपुल प्रमाणात आलेल्या पावसामुळे पाण्याची कमतरता होत नाही, आणि शेतातील पिकही चांगले येते.

     भारतात पावसाळा बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या दूर करतो.  भारतात बरेच लोक हे पाण्याच्या समस्याने त्रस्त असतात. पाऊस पडल्याने तलाव, विहीर व नद्यामध्ये पानी भरून जाते आणि लोकाना मोकळे पानी मिळते. पावसामुळे चारही दिशाना हिरवळ होऊन जाते. झाडे झुडपे पटापट वाढायला लागतात, व वातावरण आनंदित होऊन जाते.

     जास्त प्रमाणात येणार पाऊस नेहमी आंनद निर्माण करतो असेही नाही, बऱ्याचदा अति पावसामुळे नद्याना महापुर येतो. काही काही ठिकाणी जास्त पावसामुळे गांव शहर पाण्यात बुडून जातात व आर्थिक नुकसान पण होते. जास्त प्रमाणात येणाऱ्या पावसामुळे pavsala शेतातील पिके नष्ट होतात. जोरदार येणाऱ्या वाऱ्यामुळे लहान घरे व झोपडे नष्ट होऊन जातात. जोरदार पावसाचा परिणाम वाहतुकीवर होतो.

     पावसाच्या या ऋतूमध्ये वेगवेगळे कीटक जन्म घेतात या मुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. म्हणून या ऋतुत सावधगिरी बाळगायला हवी. व पावसाच्या पाण्याला संग्रहित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.12.2022-बुधवार.