मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-164

Started by Atul Kaviraje, December 29, 2022, 09:05:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-164
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --मित्रांनो , हरीश  सरांनी  या  चारोळीतून  आपल्याला  आपल्या  साथीदारासह  असण्याचा  एक  अनोखा  संदेश  दिला  आहे , जो  आपल्याला  अनेक  प्रकारे  जगण्यास   प्रवृत्त  करतो . ते  या  चारोळीतून  म्हणतात , की  एकटे  जीवन  जगणे  हे  निरसच  असतं . जीवनात  कुणाचीतरी  सोबत ,साथ  हवी  असते , जी  हा  आपला  एकाकीपणा  कायमचाच  दूर  करून  जाते , आपल्याला  आयुष्य  म्हणजे  काय  हे  सांगून  जाते , एक  नवीन  जगणे  शिकवून  जाते . अनेक  उदाहरणांनी , आणि  विशेषणांनी  युक्त  अशी  ही  हरीश  सरांची  चारोळी  म्हणजे  जीवन  जगण्याचे  एक  प्रतीकच  आहे . समाजात  राहायचे  असेल  तर सोशल  होऊन   राहा , जो  तुमचा  एकाकीपणा  घालवेल , आपले  कुणी  तरी  आपल्याला  शेवटपर्यंत  सोबत  देणारे  असेल  ही  भावनाच  किती  सुंदर  आहे , याचा  प्रत्यय  त्यांच्या  या  चारोळीतून  येतो .

==============
कुणी तरी असावी
आस्थेने विचारपूस करणारी
काय करतेस, कसा आहेस
काळजी घे म्हणनारी ||
कुणी तरी असावी
मनातल समजून घेणारी
बघताच क्षणी मनातल
सारं काही ओळखणारी ||
कुणी तरी असावी
दिसताच मिठी मारणारी
हळूवार केसांवरून हात
फिरवून आपलंसं करणारी ||
कुणी तरी असावी
जिवाला जीव लावणारी
प्रत्येक सुख – दुःखात
सोबत असणारी ||
कुणी तरी असावी
तु माझाच आहेस म्हणून
हातात हात घेऊन
प्रीतीची साथ देणारी ||
==============

~ हरिष नैताम
-------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.12.2022-गुरुवार.