३०-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 30, 2022, 09:04:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.१२.२०२२-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "३०-डिसेंबर-दिनविशेष"
                                   ----------------------

-: दिनविशेष :-
३० डिसेंबर
१९९१ मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली !
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९४३
सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
१९२४
एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
१९०६
ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९०२
डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार
(मृत्यू: १४ मे १९६३)
१९३६
हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा 'प्रिया राजवंश' यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली. त्यांचे हसते जखम, हिन्दूस्तान की कसम, हीर रांझा, हकीकत हे चित्रपट प्रसिद्ध होते.
(मृत्यू: २७ मार्च २०००)
१८७९
वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते
(मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
१८८७
डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
१८६५
रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक
(मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
३९
टायटस – रोमन सम्राट
(मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१८
मृणाल सेन – दिग्दर्शक
(जन्म: १४ मे १९२३)
२०१५
कविवर्य मंगेश पाडगावकर
(जन्म: १० मार्च १९२९ - वेंगुर्ला)
२००६
इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी
(जन्म: २८ एप्रिल १९३७)
१९९२
शाहीर पिराजीराव सरनाईक – साधी, सोपी पण अंतःकरणाला भिडणारी कवने, नादयुक्त शब्दकळा, श्रोत्यांना चेतविणारा आवेश व त्याला अनुरूप अशी देहबोली ही त्यांच्या शाहिरीची काही ठळक वैशिष्टये होत. व्यासपीठावर येताच ते 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी आरोळी देऊन श्रोत्यांच्या भावना उत्तेजित करीत. शूरवीरांचे पोवाडे रचून व आपल्या पहाडी आवाजात गाऊन त्यांनी श्रोत्यांमध्ये स्फूरण निर्माण केले. त्यांच्या गायकीला डफाच्या कडकडाटाची व तुणतुण्याच्या नादाची पार्श्वभूमी दाखल असलेली साथ वातावरणात अधिकच चैतन्य व जोश निर्माण करीत असे. त्यांची कवने जशी स्फूर्तिदायक तशीच समाज प्रबोधनपर होती. स्वातंत्र्यलढयात अनेक शाहिरांनी आपली स्फूर्तिदायक कवने गाऊन ह्या संगामाला फार मोठे बळ मिळवून दिले, अशा शाहिरांत पिराजीरावांचाही सहभाग होता. पुढे विख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते आले. त्यातून त्यांचे कवित्व आणि सादरीकरण अधिकच प्रगल्भ होत गेले.
(जन्म: २८ जुलै १९०९)
१९८७
दत्ता नाईक ऊर्फ 'एन. दत्ता' – संगीतकार
(जन्म: १२ डिसेंबर १९२७)
१९८२
दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट)
(जन्म: २ डिसेंबर१९१३ - कोल्हापूर)
१९७४
आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते
(जन्म: २८ जानेवारी १८९५)
१९७१
डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
१९४४
रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक
(जन्म: २९ जानेवारी १८६६)
१६९१
रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २५ जानेवारी १६२७)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.12.2022-शुक्रवार.