मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-165

Started by Atul Kaviraje, December 30, 2022, 09:11:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-165
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  प्रेमाची  अजब  गजब  अशी  प्रेम-कहाणी  या  चारोळीतून  सांगून  जातो . तो  म्हणतोय , मित्रांनो , प्रेम  हे  कसं  असतं , तर  प्रेम  हे  असं  असतं . या  प्रेमाला  फक्त  आपल्या  हृदयातच  जपायचं  असतं . प्रेमात  आपले  प्रेम  व्यक्त  करण्याचा  अधिकार  तर  सर्वांनाच  असतो , पण  तो  अधिकार  कधीच  गाजवायचा  नसतो . प्रेमात  प्रत्येकजण   गुलाम  असतो , याचा  अर्थ  कुणीही  कुणावर  तो  अधिकार  गाजवायचा  नसतो , राबवायचा  नसतो . प्रेमात  प्रत्येकाला  स्वातंत्र्य  असतं , पण  असं  जरी  वाटलं  तरी , हे  स्वातंत्र्य  स्वतःच  असं  खास  नसतंच . प्रेम  हे असं  असतं , की  ते  एकट्यानेच  करून  भागत  नाही , तर  प्रेमाला  साथ  देणारा  दुसरा  कुणीतरी  हवा  असतो , साथीदार , भागीदार  हवा  असतो . आणि  शेवटी  प्रेमाची  गूढ  भाषा  कशी  असते , हे  चारोळीकार  सांगताना  म्हणतोय , की  मित्रांनो , एवढं  सगळं  जरी  असलं , तरी  प्रेम  मात्र  कसं  होतं  हे  कधीच  कुणाला  कळतं  नसत , ते  आपसूक  होतं  असतं , आणि  त्याला  प्रेम  म्हणतात .

============================
💝 "असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं
प्रेमातअधिकार असतो पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो ...पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं...
असं फक्त प्रेमच असतं"💘
============================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.12.2022-शुक्रवार.