नवं-वर्ष-२०२३-कविता-4-नववर्ष गीत

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:20:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ च्या काही कविता--

                                      "नववर्ष गीत"
                                     -------------

गेले ते जुने वर्ष आता,
झाला मज हर्ष आता ||

दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे
असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे,
करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची
परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता
गेले ते जुने वर्ष आता ||

झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु
काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू,
गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ
संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ
करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता
गेले ते जुने वर्ष आता ||

"नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा
आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा,
होऊ नका देऊ कधी,घात हो ह्या विश्वासाचा
संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे
लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे,
परस्री माना आपली बहीण आणि पूज्य माता
गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता ||

--समाधान नवले
---------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.