नवं-वर्ष-२०२३-चारोळ्या-2-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:29:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ च्या काही चारोळ्या--2-

--पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी

--आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन 2023 मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.

--डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.

--आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत...
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2023 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही...

--नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.

--माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे.

--प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष...! या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

--गणेश
--------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-साहित्य दर्पण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.