नवं-वर्ष-२०२३-चारोळ्या-4-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:34:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ च्या काही चारोळ्या--4-

--हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास, अशीच राहो 2023
मध्येही आपली साथ.

--या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.

--गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात.
नववर्षाभिनंदन.

--कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.
पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो.
हॅपी न्यू ईयर.

--चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--पूर्ण होवोत तुमचे सगळे एम, सदैव वाढत राहो तुमचं फेम,
मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,
विश यू ए हॅपी न्यू ईयर.

--येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो.
ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो.
याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.

--तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर.
सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,
तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.

--"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे"...
सन 2023 साठी हार्दीक शुभेच्छा...!

--येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी...!

--गणेश
--------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-साहित्य दर्पण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.