नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-3-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:45:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--3-

--कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही.
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री
आणखी मजबूत झाली.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023!

--गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या...
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

--हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

--नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

--सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.....नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

--नववर्षाभिनंदन!
2023 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

--इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो...
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!

--गतवर्षीच्या ...
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे...
सुख दुःख झोळीत साठवून घे...
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

--जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक
पावलावर तुला मिळो, जगातील
प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                 ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.