नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-6-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:49:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "नवं-वर्ष-२०२३"
                                  ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--6-

--गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया,
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया..
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा...!

--पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी मनातून जवळ आहोत,
म्हणूनच न सांगताही
एकमेकांचं दुःख समजून घेतो..
नव्या वर्षातही असंच राहूया..
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

--कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर,
आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी?
त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.

--आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय,
कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस,
कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या.......
नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2023

--इतिहास साक्षी आहे...जेव्हा नववर्ष आलं आहे...
तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही....
देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.

--ज्याची इच्छा असेल तो तुमच्याजवळ येवो.
या वर्षी तुम्ही राहू नका बिना लग्नाचे देव करो
तुमची होणारी सासू तुमच्यासाठी स्थळ घेऊन येवो.

--नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स,
जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो.
मला चुकीचं समजू नका.
तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

--मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे.
पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.

--नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
हे नूतन वर्ष आपल्या सर्वांना मंगलमयी,
आरोग्यदायी, समृद्धीचे जावो, ही प्रार्थना !

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.