नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-8-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:51:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--8-

--पूर्ण होवोत तुमचे सगळे एम,
सदैव वाढत राहो तुमचं फेम,
मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,
विश यू ए हॅपी न्यू ईयर.

--सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील,
एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला,
नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा.

--चला या नवीन वर्षाचं
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया..
नववर्षाभिनंदन..!

--मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे...
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे....
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

--दुःख सारी विसरून जावू,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली..
नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.

--या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव.
प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र.
माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.

--कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.
पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.

--चुकांना माफी देता येते.
जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल
तर मग चला नव्याने सुरूवात करूया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

--या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.