नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-12-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:56:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नवं-वर्ष-२०२३"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--12-

--पाहता-पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन
निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
Happy New Year 2023

--नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी

--नव्या या वर्षात संकल्प करूया साधा,
सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी
मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा

--आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो

--नववर्षाची सकाळ होताच
तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय
ही प्रार्थना करू..
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
खूप खूप चांगलं जावो..

--मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे..
पण माझा काही नवा संकल्प नाही
कारण मी आधीच परफेक्ट आहे..😜

--मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

--नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2023 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

--जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे...
सन 2023 च्या हार्दीक शुभेच्छा...!

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.