नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-13-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:58:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नवं-वर्ष-२०२३"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--13-

--येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी...!

--गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2023 साल...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

--नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना...
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

--पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..

--नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

--या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

--लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील,
पण मी देवाकडे फक्त तुझी साथ मागेल..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

--मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

--सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा,
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा..
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

--माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला....या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या...
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.