नवं-वर्ष-२०२३-शुभेच्छा-संदेश-14-

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:59:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "नवं-वर्ष-२०२३"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     चला, सर्वांनी गत-वर्ष-२०२२, ला बाय-बाय करूया, आणि नवं-वर्ष-२०२३-चे जल्लोषात, उत्साहात स्वागत करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणांना हे नवं-वर्ष-२०२३, सुखाचे,समृद्धीचे,भरभराटीचे,नवं-संकल्प-पूर्णत्त्वाचे जावो, हीच सदिच्छा. वाचूया, २०२३ चे काही शुभेच्छा-संदेश--14-

--आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत...
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2023 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही...

--प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष...!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

--इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे...
Happy New Year 2023!

--नमस्कार
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या...
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

--मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे...
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे....
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

--चुकतो तो माणूस,
सुधारतो तो मोठा माणूस,
मान्य करतो तो देवमाणूस,
पण कलियुगात..
पाणी पाजतो तो माणूस,
चहा पाजतो तो मोठा माणूस,
पार्टी देतो तो "देवमाणूस"...!!!
31st जवळ आलाय..!!!
ग्रुप मधे कोण देव माणूस आहे?
देव जाणे..!!!🤔🤔🤔

--मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

--वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माय लविंग गिफ्ट्स.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.