चाँकलेट कुकिज्, काँफी आणि ग़ज़ल

Started by futsal25, August 30, 2010, 12:47:24 PM

Previous topic - Next topic

futsal25


कुंद मद-धुंद गार हवा
बाहेर सतत पाऊस धारा
रविवारची ती मोहक दुपार
होतो दिसतोय का सूर्य पहात

चाँकलेट कुकिज्, फेसाळत्या काँफीचा आस्वाद
आणि घेत 'सुरेश भटांच्या ग़ज़लेचा रसास्वाद
बँकग्राऊंडला Buddha Bar चे इंस्ट्रूमेंटल संगीत
अशी ती रम्य, स्वर्गीय, मंद-धुंद दुपार

नको ती कटकट, नको ती चिकचिक
नको त्या ब्रेकिंग न्युजचा भडिमार
नको ती सासू-सुनांची बकबक
नको ती बाँसची पकपक
नको तो बाजारू, हिडिस नंगानाच

हवी फक्त आठवडयातून एक दुपार
निवांत, रमणिय, आळसावलेली....
जी असेल फक्त माझी......,
सोबत भटांच्या ग़ज़ला, आणि
पुलंची हसवणारी पुस्तकं
बस् आणखी काही नको.

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  ;)


amoul

सोबत भटांच्या ग़ज़ला, आणि
पुलंची हसवणारी पुस्तकं

far chhan!!