मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-81-माझा आवडता ऋतू हिवाळा

Started by Atul Kaviraje, January 02, 2023, 09:43:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-81
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू हिवाळा"

     हिवाळा ऋतु भारतात नोव्हेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत राहतो. हा ऋतु सर्व ऋतुंपैकी सर्वाधिक थंड असतो. जानेवारी महिन्यात तर कधी कधी तापमान 1 अंश सेल्सिअस पर्यंत चालले जाते. हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच थंड वारे वाहायला लागतात. थंडी पासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे घालतात व रात्री जाड रजई पांघरूण झोपतात.

     हिवाळा माझा आवडता ऋतू आहे कारणं या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. जेव्हा अधिक थंडी वाढायला लागते तेव्हा शाळेला हिवाळी सुट्टी दिली जाते. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनून जातात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान होत जातात.

     भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे. जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरे कडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होते, यामुळे बऱ्याचदा बाहेरचे काहीही दिसत नाही. म्हणून विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. हिवाळ्यात उत्तरे कडे बर्फ पडतो सोबतच कडाक्याची थंडी पण वाजते. लोक ठीक ठिकाणी आग लाऊन शेकोटी करतात. कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात.

     गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्याली जाते. या ऋतूत भाजीपाला देखील जास्त असतो. दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देखील हिवाळ्यातच येतात.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.01.2023-सोमवार.