मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-169

Started by Atul Kaviraje, January 03, 2023, 09:31:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-169
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकाराने  त्याला  तिच्याबद्दल  काय  वाटतंय  हे  एका  अनोख्या  पद्धतीने  या  चारोळीतून  सांगण्याचा  प्रयत्न  केला  आहे . त्याच्या  चारोळीतील  प्रेमी  आपल्या  प्रेमिकेस  म्हणतोय , लाडके  मला  हे  जग  फक्त  तुझंच  असल्याचं  भासून  राहिलं  आहे . या  जगाचा  आदी  आणि  अंत  फक्त  तूच  आहेस , असं  मला  वाटतंय . हे  जग  तुझ्यापासून  फिरून  शेवटी  तुझ्यापर्यंतच  पोचतंय . परंतु  माझे  असे  नाही . पृथ्वी  कशी  आपली  कक्षा  परिभ्रमण  करीत , सूर्याभोवतीही  भ्रमण  करते , तद्वतच  माझंही  आहे . माझेही  जग  फक्त  तुझ्याभोवतीच  फिरत  आहे , असं  मला  वाटतंय . माझी  शेवटपर्यंत  अशी  मनीषा  आहे , की  माझं  हे  जग तुझ्या सभोवती  असंच  फिरत  राहावं , आणि  ते  असंच कायम   राहावं . माझ्या  मनाचेही  तसंच  आहे  बघ . ते  फक्त  तुझाच  विचार  करतंय , इतकं  ते  तुझ्या  प्रेमात  बुडालंय . आणि  हे  मनही  आयुष्यभर  तुझ्याच  विचारात  फिरत  राहील , यात  शंकाच  नाही .

=======================
💝 "तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्या पर्यंत असे..
हे जग माझे तुझ्या अवती भोवती फिरे..
असेच असावे, असेच राहावे..
आयुष्यभर फक्त तुझ्याच विचारात मन माझे
फिरे."💘
=======================

--नवं-चारोळीकार
----------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.01.2023-मंगळवार.