मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-82-माझा आवडता ऋतू हिवाळा

Started by Atul Kaviraje, January 03, 2023, 09:47:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-82
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू हिवाळा"

     दरवर्षी भारतात 3 ऋतु येतात. हिवाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. भारतात हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो. नोव्हेंबर महिन्यात सुरु होणारी हलकी थंडक डिसेंबर येईपर्यंत भयंकर थंडी मध्ये बदलून जाते. हिवाळ्याच्या दिवसात दिवस लहान व रात्र मोठ्या असतात. सूर्याची जी उष्णता लोकांना उन्हाळ्यात आवडत नाही ती हिवाळ्यात अंगावर घ्यावीशी वाटते. थंडीपासून बचाव म्हणून काही लोक आगीचा देखील वापर करतात.

     हिवाळ्यात कधी कधी ढग आणि धुक्यामुळे सूर्याला पाहणे देखील कठीण होते. हिवाळ्यात कपडे सुखायला खूप वेळ लागतो. हिवाळ्यात धुके निर्माण होणे सामान्य गोष्ट आहे. हिवाळ्यात अधिक थंडीमुळे अनेक पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पलायन करतात. थंडीच्या दिवसात पहाडी क्षेत्र खूप सुंदर दिसू लागतात. या काळात काही ठिकाणी बर्फ पण पडते. नोहेंबर महिन्यात सणाच्या वेळी शाळेला हिवाळी सुट्या दिल्या जातात. यामुळे मुलांना खेळायला पुरेपूर वेळ मिळतो.

     या काळात पर्वती भागात पडणार बर्फ खूप सुंदर दिसतो. हिवाळ्याच्या दिवसात झाडांची वाढ थांबून जाते. झाडांचे पान गळून पडतात. झाडांचा व पानांचा रंग रंगबिरंगी होऊन जातो. जो सर्वांचे मन मोहून घेतो. बऱ्याचदा हिवाळ्याच्या  दिवसात सकाळच्या वेळी धुक्यामुळे दूरचे दिसत नाही. मला हिवाळ्यातील धुक्याचे दृश्य पहायला आवडते. हिवाळ्यात दिवसभर थंडगार वारे वाहत राहतात.

     हिवाळा एकीकडे ज्याप्रमाणे सामान्य माणसासाठी आनंद निर्माण करतो तर दुसरीकडे गरिबाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. थंडी मुळे बरेच गरीब लोक आजरी पडतात. कारण हिवाळ्याच्या या थंडीत त्यांच्या कडे घालायला पुरेसे गरम कपडे नसतात. रस्त्यावर राहणाऱ्या बऱ्याच लोकांचा थंडी मुळे मृत्यू देखील होते. शासनाने गरिबांसाठी हिवाळ्याच्या काळात मदत पुरवायला हवी.

     हिवाळा हा एका पद्धतीने जीवनातील संघर्षांचा सामना करण्याची शक्ती प्रदान करतो. पर्यावरणासाठी सर्वच ऋतूंची आवश्यकता असते. हिवाळ्या च्या या दिवसात अनेक सण उत्सव देखील येतात म्हणून या काळात बाजारात गर्दी पाहायला मिळते. हिवाळा ऋतु सर्वच मनुष्य व पशू प्राण्यांना आवडतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आळस न करता हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा अशा पद्धतीने प्रत्येक ऋतूत कार्य करत राहायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.01.2023-मंगळवार.