कवेत आता तु भर

Started by शिवाजी सांगळे, January 04, 2023, 12:48:04 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कवेत आता तु भर

थंडीचा कडाका ज्वानीचा भडका होईल आता रातभर
ओढून काडी पेटवून लाकडं काहीतरी उबदार सोय कर

गारठून गेली सारी काया, आकसून गेली गात्रं
क्षणाक्षणाला रुप बदलून झोंबते बघना हि रात्र

कसं आणिक किती सावरू
गारठ्याला या कसं आवरू
ओढून घेतला अंगभर पदर...१
थंडीचा कडाका ज्वानीचा भडका...

काळोखामधी धुमतय वारं लागलं अंग थरथरु
अवतीभवती काही दिसनां कुठं मी आसरा धरू

शेकोटीनं पण उब मिळना
हिव भरल्या अंगा सोसना
खुशाल कवेत आता तु भर...२
थंडीचा कडाका ज्वानीचा भडका...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९