०६-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 06, 2023, 09:20:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०१.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "०६-जानेवारी-दिनविशेष"
                                -----------------------

-: दिनविशेष :-
०६ जानेवारी
पत्रकार दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९४४
दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
१९२९
गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
१९२४
राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
१९१२
न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
१९०७
मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
१८३२
दर्पण
पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र 'दर्पण' सुरू केले. ही मराठी पत्रकारितेची सुरवात मानली जाते. त्याप्रित्यर्थ हा 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.
१६७३
कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्‍न पूर्ण केले.
१६६५
सुवर्णतुला
शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६६
ए. आर. रहमान – संगीतकार
१९५९
कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
१९५५
रोवान अ‍ॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक
१९३१
डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ, 'महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स'चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष
१९२५
रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
(मृत्यू: १९ जून १९९८)
१८८३
खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार
(मृत्यू: १० एप्रिल १९३१)
१८६८
गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, 'भक्तिरसामृत', 'भक्तकथामृत' आणि 'संतकथामृत' हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)
१८१२
बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. 'दिग्दर्शन' हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(मृत्यू: १८ मे १८४६)
१४१२
'जोन ऑफ आर्क' – फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणारी. ती 'द मेड ऑफ ऑर्लिन्स' या टोपणनावानेही ओळखली जाते. आधी तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले.
(मृत्यू: ३० मे १४३१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१७
ओम पुरी – अभिनेता
(जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)
२०१०
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक
(जन्म: १६ जुलै १९४३)
१९८४
'विद्यानिधी' सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार
(जन्म: १ फेब्रुवारी १८८४)
१९८१
ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक
(जन्म: १९ जुलै १८९६)
१९७१
प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
(जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)
१९१९
थिओडोर रुझव्हेल्ट
अधिकृत छायाचित्र (द व्हाईट हाऊस)
थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: १४ सप्टेंबर १९०१ ते ४ मार्च १९०९), नोबेल शांतता पारितोषिक (१९०६) विजेते
(जन्म: २७ आक्टोबर १८५८)
१९१८
जी. कँटर – जर्मन गणितज्ञ
(जन्म: ३ मार्च १८४५)
१८८५
भारतेन्दु हरिश्चंद्र
भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात 'भारतेंदू काळ' म्हणून ओळखला जातो.
(जन्म: ९ सप्टेंबर १८५०)
१८८४
: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ
(जन्म: २० जुलै १८२२)
१८५२
लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक
(जन्म: ४ जानेवारी १८०९)
१८४७
त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार
(जन्म: ४ मे १७६७)
१७९६
जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.01.2023-शुक्रवार.