मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-172

Started by Atul Kaviraje, January 06, 2023, 09:26:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-172
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  निसर्गामध्ये  गुंग  होऊन  बरंच  काही  या  चारोळीतून  सांगून  गेलाय . वाऱ्याचे  गुणगान  गात  असता  तो  म्हणतोय , वारा  असा  गुपचूप , कुणाला  कळू  न  देता  अलगद  येतो . हळूच  येऊन  निःशब्द  कळ्यांना  खुलवून , फुलवून  जातो . मग  ती  फुललेली  फुले  जगाला  खिलवून , हसवून  जातात . तो  येतो , वाहतो  आणि  जातो . पण  आपले  अस्तित्त्व  तो  या  ना  त्या  रूपे  ठेवून  जातो . कधी  कधी  तो  रोमांचित  करून  जातो . कधी  तो  मौन  धारण  करतो , तर  कधी  मौनाच्या   आणि  स्पर्शाच्या  भावनेने  खुलून , फुलून  जातो . असा  लपाछपीचा  खेळ  खेळतं , त्या  रंगात  रंगून  जातो . पहाटे , सकाळी , दुपारी  आणि  संध्याकाळच्या  उन्हात  तो  अलगदपणे  मिसळून  जातो . असा  हा  गूढ  वारा  आजही  नवं-चारोळीकारास  अनाकलनीय  असा  भासतो . पुढे  चारोळीकार  म्हणतोय , रात्री  उगवलेल्या  चांदण्याचा  प्रभाव , सकाळी  उगवलेल्या  सूर्याच्या  प्रकाशात  निष्प्रभ  होतो . या  हरवलेल्या , निस्तेज  पडलेल्या  चांदण्यांना  ते  आभाळ  सावरून  तर  घेतेच , पण  हा  वाराही  त्या  तारकांना , चांदण्यांना  क्षितिजा  पलीकडेही  जाऊन  शोधून  काढतो , हुडकून  काढतो . अशी  ही  वाऱ्याची  अनेक  वैशिष्ट्ये  आहेत .

========================
वाऱ्याचे असेच असते, हळूच येवून स्पर्शून जाणे,
नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित देत खुलवून जाणे !
येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व तो ठेवून जातो,
स्मरण होता कधी कधी, रोमांचित करून जातो !
मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो,
स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो !
खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो,
सांज सकाळच्या उन्हात, अलगद मिसळून जातो !
सावरणे ते चांदणीला, स्वभाव गगनाचा तो,
हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !
========================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.01.2023-शुक्रवार.