माझ्यावर प्रेम कर

Started by anandamrut, August 30, 2010, 08:57:05 PM

Previous topic - Next topic

anandamrut

      आभाळातून बरसताना मेघांना     धरणीसाठी जे वाटते ,  तीच आर्तता   माझ्या  नेत्रांना तुझ्या रूपा साठी वाटते ,    रानि चुकल्या पाडसाला   आईची  जी ओढ दाटते ,    तीच व्याकुळता माझ्या पावलांना तुझ्या भेटीसाठी लागते, मधाच्या ओढीने भुंग्याला             फुलाविषयी जे वाटते, तीच भूक माझ्या मनाला तुझ्या प्रेमासाठी वाटते,  आकाश भरून आले कि   कोकिळेला जी तहान दाटते,  तोच शोष माझ्या हृदयाला तुझ्या  विरहात जाळतो ,  तेव्हा जिथे असशील तिथून माझ्यासाठी  धावत ये,  या प्रेम पाडसाला उराशी कवटाळून घे दोन क्षण आयुष्याचे माझ्यासाठी खर्च कर,माझ्यावर प्रेम कर फक्त माझ्यावर प्रेम कर,