प्रेम-गीत-तुला पाहता मी बावरले, पाहून मी मोहरले

Started by Atul Kaviraje, January 08, 2023, 11:09:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक वेगळे प्रेम-गीत ऐकवितो." मिलो ना  तुम  तो हम  घबराये, मिलो तो आख  चुराये , हमें क्या हो गया है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही रविवार सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आख चुराये, हमें क्या हो गया है)
--------------------------------------------------------------------------

                         तुला पाहता मी बावरले, पाहून मी मोहरले
                         सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले
                       --------------------------------------

तुला पाहता मी बावरले, पाहून मी मोहरले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुला पाहता मी बघ भुलले, पाहुनी तुलाच खुलले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

रे माझ्या प्रियकरा, माझ्या सख्या रे माझ्या जिवलगा
तुझ्याचवरती प्रेम मी केले, तुलाच मन मी दिले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुझ्याचसाठी मी बघ आले, आणि तुझीच झाले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

मनापासुनी तुलाच वरले, तुला मी स्वीकारीले 
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

रे माझ्या दिलबरा, माझ्या सख्या रे माझ्या लाडक्या
तू माझा मोहनI, मी तुझीच रे राधा,
तुझ्या मुरलीने वेड लाविले, मजला पागल केले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुझाच पडता एक कटाक्ष, गाली गुलाब फुलले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुझ्या शब्दांनी केली जादू, बघ मी मोहित झाले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तूच माझे सर्वस्व, तूच आहेस माझा प्राणही
जीवन माझे तूच आहेस, तुझीच रे मी झाले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुला मिळवुनी मी आनंदले, हवे ते सारे मिळाले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

अजून नाही इच्छा कसली, असेच मज तू प्रेम दे
तुझ्या प्रेमाने मन हे भरले, मी बघ तृप्त झाले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुला पाहता मी बावरले, पाहून मी मोहरले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले

तुला पाहता मी बघ भुलले, पाहुनी तुलाच खुलले
सख्या मी खुळी झाले,सख्या मी वेडी झाले
=============================

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.01.2023-रविवार.
-------------------------------------

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
------------------------------------------------------------------------