माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?

Started by Atul Kaviraje, January 08, 2023, 06:21:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक वेगळे दुःख-गीत (SAD-SONG) ऐकवितो. "अपने जीवन की उलझन को मै कैसे सुलझाऊ ?"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज - रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (अपने जीवन की उलझन को मै कैसे सुलझाऊ ?)
------------------------------------------------------------

                     माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
                    --------------------------------------------

माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
भोवऱ्यात सापडलीय नाव माझी, कशी किनारी मी ती लावू ?

नशिबाचे फेरे झालेत पलटे
दैवाचे फासे हो पडलेत उलटे
कृतीला माझ्या अर्थच नाही
प्रयत्नाला माझ्या यशच नाही,
     आणि कितीदा मना फसवावे ?
     आणि कितीदा मना समजवावे ?

माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
भोवऱ्यात सापडलीय नाव माझी, कशी किनारी मी ती लावू ?

ज्यांच्यावरती होता विश्वास
ज्यांच्यावरती होती मदार
ते मजसी फसवून गेले
ते मला टाळू लागले,
     आणि कितींदा विसंबूनी राहावे ?
     आणि कितींदा डोळ्यांनी झुरावे ?

माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
भोवऱ्यात सापडलीय नाव माझी, कशी किनारी मी ती लावू ?

सर्वांवर मी उपकारच केले
अपकार माझ्या नशिबीच आले
संधी साधूनी मज फसविले
स्वभावाचे माझ्या येथेच नडले,
     माणूसच माणसाचा का आहे वैरी ?
     कुणी नाही माझा कैवारी ?

माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
भोवऱ्यात सापडलीय नाव माझी, कशी किनारी मी ती लावू ?

स्वप्न पाहिले मी दुभंगलेले
पूर्णत्त्वाला ते कधीही न गेले
विश्वास नाही उरला जीवनावर
विश्वास नाही आता कोणावर,
     जवळचे मज सोडून गेले
     मज एकाकी टाकून गेले,

माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
भोवऱ्यात सापडलीय नाव माझी, कशी किनारी मी ती लावू ?

दुःखे मनाने किती पचवावी ?
व्यथा मनाने किती ही सहावी ?
अश्रूही माझे आज आटलेत
भाव डोळ्यांचे निरस झालेत,
     जगण्यात आता अर्थच नाही
     मरणाने मज जवळ करावे,

माझी दैना झाली अशी ही, मी कोणाला कसं सांगू ?
भोवऱ्यात सापडलीय नाव माझी, कशी किनारी मी ती लावू ?
=============================

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.01.2023-रविवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================