का होताहेत संप वारंवार ?

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 03:20:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     गेली  कित्येक वर्षे निवासी डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर पडलेला आहे. काय कारण असावे, कि ते वारंवार संपावर जातात. सरकार त्यांच्या समस्या सोडविण्यास असमर्थ आहे का ? या डॉक्टरांचे अनेक प्रश्न, त्यांच्या अनेक मागण्या अजूनही  विलंबित आहेत. सरकारकडे त्यांची अपेक्षा आहे की, निदान त्यांच्या काही समस्येकडे तरी लक्ष पुरवावे. पण डॉक्टर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, की तुमच्या आणि सरकारच्या रस्सी-खेचात त्या बिचाऱ्या रुग्णांचे, पेशंटचे मरण होतंय, त्यांचे हाल होताहेत. त्यामुळे आपणास माझी विनंती आहे की, एक सुवर्ण-मध्य काढा व रुग्णांच्या सेवेला वाहून घ्या. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतीलच यात शंकाच नाही, आणि वर तुमच्या मागण्याही मान्य होतील. माझ्याकडून तुम्हाला "ALL THE BEST". ऐकुया तर या विषयावर एक वास्तव-वादी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "का होताहेत संप वारंवार ?"

                                "का होताहेत संप वारंवार ?"
                               -------------------------

का होताहेत संप वारंवार ?
का होतोय बंडाचा पुकार ?
विपरीत झाले जरी मनाच्या ,
तरी उगारायचं आंदोलनाचे हत्यार !

     निवासी डॉक्टरही त्यातले एक
     मागण्या आहेत त्यांच्या अनेक
     कुठे राहावयास घर नाही,
     कधी भत्ताच मिळत नाही

महिन्याकाठी पगाराची वाट पाही
सुख-सुविधांची तर बातच नाही
गैर-सोयींनी सारे जीवन भरलेले,
तरी ओढत-कुढत जगत राही

     डॉक्टरांनी अखेर संप पुकारलाय
     मागणी-पूर्तीस त्यांच्या विलंब झालाय
     फलक घेऊनी रस्त्यावर उतरलेत,
     बैठकांनी सारे रस्ते अडवलेत

सरकार सारे जाणून आहे
डोळ्यांवर झापड बांधून आहे
संप यशस्वी होत नाही,
सरकार कधी बधत नाही

दोघांच्या भांडणात लाभ कोणाला ?
उलट रुग्णालाच तोटा झाला
दोघांच्या वादात मरण पेशंटचे,
सेवेशिवाय रुग्णालयात ताटकळत पडायचे

     रुग्णांच्या जीवाशी खेळू नका
     दोघांनी आपला सोडा हेका
     सरकारने थोडे पुढे यावे,
     डॉक्टरांनी थोडे मागे जावे

डॉक्टरांनी संप मागे घ्यावा
सरकारने मागण्या मान्य कराव्या
यातच भले आहे दोघांचे,
आणि त्या बिचाऱ्या रुग्णांचे

     सामोपचाराने बोलणी व्हावी दोघांत
     अन्यथा पर्यावसान होईल युद्धात
     संपाचे हत्यार मागे घेऊन,
     डॉक्टरांनी झोकून द्यावे सेवेत

संप नाहीय अंतिम अस्त्र
आंदोलन नाहीय अखेरचे शस्त्र
डोळ्यांपुढे ठेवून उद्दिष्ट्य कार्याचे,
सेवेचा जपावा एकच मूल-मंत्र

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.
=========================================