फुटबॉलचा तारा निखळून पडला

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 05:31:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

ब्राझीलचा महान फुटबॉलपटू, फुटबॉलचा जादूगार, ज्याने कित्येक सामन्यात १००० पेक्षाही जास्त गोल केले, ज्याने  फुटबॉल क्षेत्रात इतिहास घडविला, अश्या नामांकित फुटबॉलपटू "पेले" यांचे दिनांक-३०.१२.२०२२ रोजी वयाच्या ८२-व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. ही भावपूर्ण कवितारूपी श्रद्धांजली मी त्यांना वहात आहे. ऐकुया तर एक प्रेरणादायी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "फुटबॉलचा तारा निखळून पडला"

                             "फुटबॉलचा तारा निखळून पडला"
                            ------------------------------

मैदानात बॉलसह जोरदार धावला
सर्वांना चुकवून गोल केला
प्रेक्षकांनी त्याला डोईवर घेतला,
फुटबॉलचा तारा आज निखळून पडला

     बालपण गेले अति हलाखीत
     शिक्षण झाले फार गरिबीत
     अंगच्या गुणांना वाव मिळाला,
     ब्राझीलच्या मातीत तयार झाला

फुटबॉलपटू म्हणून प्रसिद्दीस आला
जादूगार फुटबॉलचा ओळखला गेला
फुटबॉल प्रेक्षकांचा देव झाला,
पेले नावाचा इतिहास घडला

     पाठी वळून नाही पाहीले
     मुसंडी मारून मैदान गाजविले
     पायात बॉल भिंगरीसम फिरायचा,
     प्रतिस्पर्ध्याचा चक्क गोंधळ उडायचा

सर्वाधिक गोलांवर नाव कोरले
पेलेने ब्राझीलचे नाव राखले 
अनेक दशके त्याने गाजवली,
झंझावाती वेगाने स्पर्धा जिंकली

न भूतो न भविष्यती
त्याचे नाव कोरले गेले
कृतीत त्याने आपल्या उतरविले,
फुटबॉल खेळास प्राधान्य मिळाले

     चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला
     साऱ्यांचाच तो चाहता झाला
     पेलेची आहे गरज खेळाला,
     आदर्श आहे आजच्या पिढीला

आज एकही गोल नाही झालाय
फुटबॉलचा जादूगार काळ-पडद्याआड गेलाय
देश सर्व-श्रेष्ठ फुटबॉलपटूस मुकलाय,
फुटबॉललाही आज हुंदका फुटलाय

     आज मैदान सुने आहे
     आणि कुणा पेलेची वाट पाहत आहे
     नाही झाला, होणार नाही,
     पेलेसम अष्टपैलू तोच राही

एक चमकता तारा निखळलाय
एक झंझावाती वादळ शमलंय
प्रवास पेलेचा येथेच संपलाय,
आज तो अनंतात विलीन झालाय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.
=========================================