बैल गेले, बाईक आली

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 12:43:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक १५.०१.२०२३-रोजी मकर संक्रांतीचा शुभ पर्व येत आहे. सूर्याचे या दिवशी मकर संक्रमण होत असते. म्हणून हा दिवस मकर-संक्रांति या नावाने ओळखला जातो. या दिवशी तीळ आणि गूळ या दोन पदार्थाना विशेष असे महत्त्व असते. सर्व देशभर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तिळाच्या पदार्थांचे आणि लाडूंचे एकमेकांना आदान-प्रदान करून " तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला", असे म्हणून एकमेकांतील वाद, भांडणे मिटवून सर्व एक होण्याचा हा गोड दिवस आहे. गुजरात शहरीही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. पण या वेळी एका व्यावसायिकाने तीळ-गुळाचा पदार्थ बनविण्यासाठी कसा काय जुगाड केलाय ते आपण पुढील कवितेतून वाचूया. तेथे हा तीळ-गुळ पदार्थ "कचरीयू" म्हणून ओळखला जातो. तेव्हा, त्याकाळी घाण्याला जसे बैल जोडले जायचे, आणि ते बैल घाण्या-सभोवती फिरून काम करायचे. आता गेल्याच आठवड्यात म्हणजे, नवं-वर्षाच्या पहिल्या आठवड्यात यु-ट्यूब-ला बातमी होती, की तेथील एका व्यक्तीने, आता बैल मिळत नसल्यामुळे, चक्क बाइकच घाण्याला जोडून,जुंपून तीळ-गुळाचा अनोखा जुगाड केला होता. वाचूया, तर ही अनोखी-जुगाडी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "बैल गेले बाईक आली"

                                  "बैल गेले, बाईक आली"
                                 ----------------------

"तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला"
ब्रीद-मंत्र आहे मकर संक्रांतीचा
तीळ गुळाचे पदार्थ सेवून,
अंगात उब, उष्णता आणण्याचा.

     वर्षाकाठी येणारा हा गोड-सण
     सूर्याचे होतंय मकर संक्रमण
     हा दिवस साजरा करती,
     प्रेमाने सारे, सर्व जण.

नवं-वर्षाचा हा प्रथम सण
घेऊन येतोय प्रेमाचा गोडवा
सारे भेटती, एकमेका आलिंगिती,
हेवे-दावे, तंटे-वाद दूर करिती.

     जगभर होतोय साऱ्या साजरा
     गुजरातही नाही यास अपवाद
     सर्वांना एक करणारा सण,
     यात मुळीच नाहीय वाद. 

व्यावसायिक गुजराती एक हुशार
निष्णात करण्यात धंदा व्यवहार
तीळ गुळाचा आहे व्यापारी,
धंद्यात त्याची आहे नफा-खोरी.

     ते दिवस गेले बैलांचे
     अन घाण्याला त्यांना जोडण्याचे
     आता बैल मिळत नाही,
     घाण्यालाही गंज चढत राही.

व्यापाऱ्याने अनोखा जुगाड केलाय
घाण्याला चक्क दुचाकीला जुंपलाय
बाईक गोल गोल फिरते,
आणि बैलाचे काम करते.

     बाईक अथक फिरत राही
     गूळ तिळास घाण्यात पिळत राही
     थोडे खर्चिकच काम हे,
     पण आधुनिक जुगाड आहे  सही.

बैल गेले, बाईक आली
नवं तंत्रज्ञानाची देत ग्वाही
पाहण्या जुगाड उडतेय झुंबड,
"कचरीयू" पहा तयार होई.
     
तीळ-गुळाची ही नवं निर्मिती
सारे जण गमतीने पाहती
काय शक्कल निघालीय मेंदूतून,
सारे जन वाहवा करिती.

     बैल गेले, बाईक आली
     आधुनिकतेची आज कमIल झाली
     एक अनोखी मकर संक्राती,
     आज गुजरातमध्ये साजरी झाली.

असेच जुगाड होत राहावेत
नव्या संकल्पना जन्मत राहाव्यात
आधुनिक तंत्रज्ञानाची घेत मदत,
त्या भविष्यातही प्रचलित व्हाव्यात.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.
=========================================