डॉक्टरांचा सल्ला, आहे अतिमोलाचा

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 03:34:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     एखादा रोग जडला, किंवा आजार वाढला की आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर आपल्याला  तपासून  त्याप्रमाणे औषध योजना करतात. त्यासाठी ते औषधांचे PRESCRIPTION लिहून देतात. नंतर आपण ते  PRESCRIPTION घेऊन एखाद्या MEDICAL STORE मध्ये जातो, व त्याप्रमाणे औषधें सुरु करतो. कालच म्हणजे दिनांक-०८.०१.२०२३-रविवारी यु-ट्यूबला एक बातमी पहिली, काही काही MEDICAL STORES, PRESCRIPTION विनाच औषधे देत आहेत. हे चुकीचे आहे, असं मला वाटत. समजा डॉटरांच्या PRESCRIPTION शिवाय, एखादा पेशंट तेथे गेला, आणि त्याला ते औषध लागू पडले नाही, आणि त्याचा उलट परिणाम झाला, तर ते कितीला बरं जाईल ? त्यामुळे रुग्णांनी त्यांच्या जीवाशी स्वतःच खेळू नये, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावे, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती. वाचूया तर या वास्तवावर एक गंभीर कविता. या कवितेचे शीर्षक आहे-"डॉक्टरांचा सल्ला, आहे अतिमोलाचा"   

                            "डॉक्टरांचा सल्ला, आहे अतिमोलाचा"
                           ---------------------------------

डॉक्टरांचा सल्ला, लाख मोलाचा
डॉक्टरांची चिट्ठी, अति महत्त्वाची
हयगय नको येथे रुग्णांची,
यथायोग्य काळजी घ्यावी जीवाची.

     अंगावर नये काढू आजार
     त्वरित करावे सारे उपचार
     डॉक्टरांचा उपयुक्त सल्ला घ्यावा,
     आजार पूर्ण बरा करावा.

डॉक्टरांचे PRESCRIPTION अति महत्त्वाचे
उपाय त्यात रुग्णांच्या आजाराचे
रोगबर हुकूम औषधांची योजना,
त्याप्रमाणे पालन करावे तयाचे.

     एखादा रुग्ण हुशार अति
     त्याची गंजलीय पहा मती
     PRESCRIPTION शिवाय औषधे खरीदी,
     स्वतःच पोचवी शरीराला क्षती.

पश्चात्ताप करुनि उपयोग नाही ?
यात चूक रुग्णाचीच राही ?
चुकीच्या औषधांनी रोग उलटे,
उपाय योजनेने पारडे पलटे.

     MEDICAL STORE ने घ्यावी खबरदारी
     PRESCRIPTION शिवाय औषध मिळणार नाही
     मोठ्या अक्षरात फलक टांगावा,
     वर ठळक अक्षरात रंगवावा.

नये खेळू रुग्णांच्या जीवाशी
पटवून द्यावे त्यांनी त्यांसी
नामांकित कंपनीचीच औषधे घ्यावी,
जुनी औषधे फेकून द्यावी.

     यापुढे रुग्णांनी खबरदारी घ्यावी
     PRESCRIPTION नुसारच औषधे खरिदावी
     MANUFACTURING आणि EXPIRY तारीख तपासावी,
     अन उपाय-योजना सुरु करावी.

PRESCRIPTION विना औषधे गुन्हाच आहे एक
MEDICAL STORE वालIही असावा नेक
रुग्णांचा विश्वास संपादन करुनी,
नये लावूत किमती अनेक.

     एक आरोग्य-मंत्र लक्षात ठेवावा
     PREVENTION IS BETTER THAN CURE
     अतिरिक्त खान-पान नेहमीच टाळावे,
     आपली LIFE-STYLE अन DIET बदलावे.

ठणठणीत तब्येत तुमची राहील
औषध कोसो दूर राहील
फक्त जीवनाचे नियम पाळा,
रोग-राईना तुम्ही कायमचेच टाळा. 

     जीवन हे एकदाच मिळते
     त्याचे योग्य जतन करा
     शेवटी HEALTH IS WEALTH,                 
     निरोगी रहा, खुश रहा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.
=========================================