जेव्हा तुला पहिल्यापासून, माझा मीच नाही उरलो

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 05:03:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम-गीत ऐकवितो. "तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यू मुझको लगता है डर"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज मंगळवार  आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यू मुझको लगता है डर)
--------------------------------------------------------------

                      "जेव्हा तुला पIहिल्यापासून, माझा मीच नाही उरलो"
                     --------------------------------------------

जेव्हा तुला पIहिल्यापासून
माझा मीच नाही उरलो
प्रेम पाशात अडकून तुझ्या,
नकळत तुझा कसा झालो.

म्हणत होते मन माझे
जेव्हा तुला पाहिले होते
हीच तुझी माया आहे
हीच तुझी छाया आहे,
     आवडू लागलीस तेव्हापासून,
     मनी वसलीस तेव्हापासून.

तुझ्यावर सखे जीव जडला
साधेपणा तुझा मज आवडला
तुझा मला होकार होता,
मलाही काही इन्कार नव्हता,
     प्रेम जडले, मनही जुळले,
     तुझे नि माझे नाते जुळले.

माझ्या दिलाची राणी झालीस
लाडके आता तू माझी झालीस
हवे होते ते मज मिळाले
प्रेमाने माझे जग बदलले,
     कारण झालीस तूच याला,
     तुझी लाभली साथ मला.

जीवन सुंदर भासू लागले
आयुष्यात आलीस जेव्हापासून
जीवनाचा अर्थ कळला मला
जीवनात आलीस तेव्हापासून,
     प्रेमाने तुझ्या खूप दिले,
     माझ्या आयुष्याचे सोने केले.

माझीच होऊन रहा तू राणी
प्रेमाची नवीन सुचतील गाणी
जन्मोजन्मी मला दे साथ तू
जन्मोजन्मी राहीन तुझा मी ऋणी,
     तुझ्यावाचून जीवन नाही,
     तू नसलीस तर मीही नाही.

जेव्हा तुला पIहिल्यापासून
माझा मीच नाही उरलो
प्रेम पाशात अडकून तुझ्या,
नकळत तुझा कसा झालो.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================