प्रेमाच्या पल्याड मला जायचंय ग !

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 05:27:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक  प्रेम-गीत ऐकवितो. "धीरे धीरे प्यार को बढाना है, हद से गुजर जाना है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (धीरे धीरे प्यार को बढाना है, हद से गुजर जाना है)
-------------------------------------------------------------

                            "प्रेमाच्याही पल्याड मला जायचंय ग !"
                           --------------------------------

प्रेमाच्याही पल्याड मला जायचंय ग !
कायमचाच मला तुझा व्हायचंय ग !

तूच माझी राणी ग
तूच माझी कहाणी ग
तूच माझे गाणे ग
तूच माझी कविता ग,
     तुझ्यासाठी प्रेम गीत गातोय मी,
     तुला प्रत्येक ओळीतच पाहतोय मी.

प्रेमाच्याही पल्याड मला जायचंय ग !
कायमचाच मला तुझा व्हायचंय ग !

तूच माझी प्रीत आहेस
तूच माझे गीत आहेस
स्वप्नी माझ्या येणारी तू
ओळखीची मज नित आहेस,
     वास्तवात यायचं आज टाळतोय मी,
     स्वप्नातच धुंद आज विहरतोय मी.

प्रेमाच्याही पल्याड मला जायचंय ग !
कायमचाच मला तुझा व्हायचंय ग !

तुझ्यासवे ही प्रीत जुळली
तुझी कशी ती कळी खुलली
लाज तुझ्या गाली दिसली
हलकेच मग लाली आली,
     तुझ्या या रुपावरती फिदा मी,
     तुझ्या सौंदर्याचे गीत गातो मी.

प्रेमाच्याही पल्याड मला जायचंय ग !
कायमचाच मला तुझा व्हायचंय ग !

मनात फक्त तूच एक वसलीस ग
जागोजागी तूच मला दिसलीस ग
तुझ्या एका नजरेसाठी झुरतोय ग
तुझ्या होकाराची वाट पाहतोय ग,
     उशीर नको लावूस, दे ना होकार ग,
     आर्जव तुज माझा, मज स्वीकार ग.

प्रेमाच्याही पल्याड मला जायचंय ग !
कायमचाच मला तुझा व्हायचंय ग !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================