भिंत द्वेषाची पाडून टाकूया !

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 10:43:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     गेला बराच काळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद प्रश्न ऐरणीवर आहे. हा मुद्दा इतका धारेवर का धरला गेला ? काय हवंय कर्नाटक सरकारला ? का ते असं वागतंय ? वाचूया तर या ज्वलंत वास्तव विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "भिंत द्वेषाची पाडून टाकूया !"
         
                               "भिंत द्वेषाची पाडून टाकूया !"
                              ---------------------------

भारत माझा देश आहे
जय-घोषाला का सीमा आहे ?
हिंदुस्थानची करू पाहतात शकले,
एकीचे महत्त्व काय कळले ?
     द्वेषाची भिंत पाडून टाकूया,
     सीमावादाचा प्रश्न कायमचाच मिटवूया !

मजहब नही सिखातI हमें
आपस मे बैर रखना 
हिंदु है वतन है,
सारा हिंदुस्थान हमारा है I

भिजत घातलंय घोंगड आजही
ज्वलंत प्रश्न होता कालही
त्या जखमेचा नासूर झालाय,
सीमावादाचा प्रश्न फारच चेकाळलाय.

रक्त एकचं तरी का द्वेष ?
जरी असले नाना वेष
माणूस आज माणुसकी विसरलाय,
जातीच्या राजकारणात आंधळा झालाय.

कर्नाटका काय, महाराष्ट्रा काय ?
माणूस तर तोच आहे
भाषेचे येथे महत्त्व नाही,
एकीनेच येथे राहायचे आहे.

वाद चाललंIय क्षुल्लक कारणातून
राजकारण होतंय मोठं यातून
सामान्य येथे जातोय भरडला,
कंटाळलाय सीमावादाच्या जाचक लढ्याला.

माणूसच माणसाचा शत्रू येथे
जुळेल का मित्रत्त्वाचे नाते ?
तुझं माझं करण्यात आयुष्य गेलं,
आता अवघ म्हातारपण आलं.

प्रश्न तरीही अनुत्तरित आजही
सीमावादाचा उद्या पेटेल वणवाही
खाक होईल जळून माणुसकी,
नावाला नाही उरेल राखही.

प्रगतीस अडथळा करतोय सीमावाद
माणसाला माणसाने माणुसकीने वागवावे
भाषा-वेषाचा वाद तोडून कायमचा,
एक व्हावे, एकत्र रहावे.

यंदाचा नवीन संकल्प करूया
संधी करून महासत्ता बनूया
सीमेची सारी बंधने तोडूया,
मने राखूया, मने जिंकूया.
     द्वेषाची भिंत पाडून टाकूया,
     सीमावादाचा प्रश्न कायमचाच मिटवूया. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.
=========================================