प्रेम-गीत-मनाची हाक ऐक ना तू, हृदयाचे गीत ऐक ना तू !

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 05:52:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक  प्रेम-गीत ऐकवितो. "दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गयी है तुमसे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गयी है तुमसे)
---------------------------------------------------------------

                       मनाची हाक ऐक ना तू, हृदयाचे गीत ऐक ना तू !
                      ------------------------------------------

मनाची हाक ऐक ना तू,
हृदयाचे गीत ऐक ना तू !

प्रेमाची हीच सुरुवात आहे ग
पुढचे पाऊल उचलायचे ग
तुझी साथ मला हवी आहे ग
तुझी साद मला हवी आहे ग,
     प्रेमाचा हाच समज इशारा,
     हृदयाचे स्पंदन ऐक जरा.

मनाचे भाव समजून घे तू
प्रेमाचे संगीत ऐक ना तू
तुला पाहून मन मोहरते ग
तुझ्या स्पर्शाला झुरते ग
मनास समजावयाचे कसे ग
त्याची समजूत कशी काढू ग,
     आठवणीने तुझ्या येतोय शहारा,
     रोमांचाचा अंगी फ़ुलतोय फुलोरा.

प्रेम माझे ओळख तू
प्रीत माझी पारख तू
मन तुझ्यापाशीच धावतंय ग
मन तुझ्यासाठीच झुरतंय ग
मनाचे एक मागणे आहे ग
तू फक्त माझीच आहेस ग,
     आता सोड पाहू तुझा नखरा,
     दे होकार या प्रेम पाखरा.

मनात आहे वसलीस तू
मनात आहे भरलीस तू
डोळ्यातले प्रेम पहा ना ग
हृदयाची धडधड ऐक ना ग
सुगंध घेऊन आलाय वारा
पखरीत सुरभी मधू धारा,
     गेलो समजुनी हाच इशारा,
     पाऊले वाजली माझ्या द्वारा.

मनाची हाक ऐकलीस तू,
हृदयाची साद ऐकली मी,
मनाने मज स्वीकारलेस तू,
मला आपलेसे केलेस तू.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================