पुढे आम्ही जाणार कसे ?

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 10:32:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     नवं-वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात यू-ट्यूबला एक बातमी ऐकली होती की, विद्यार्थ्यांना परीक्षेत शिष्यवृत्ती तर मिळालीय, परंतु ती त्यांना देण्यास, प्रदान करण्यास सरकारी तिजोरीत निधी जमा नाहीय, चक्क खडखडाट आहे. ऐकुया या पुढील वास्तव-ज्वलंत कवितेतून, शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत. या कवितेचे शीर्षक आहे-  "पुढे आम्ही जाणार कसे ?"

                               "पुढे आम्ही जाणार कसे ?"
                              -------------------------

जागून केला अभ्यास रात्रं-दिवस
खेळ-झोपेला देऊन तिलांजली
अंती परिश्रम फळास येऊन,
आम्हा सरकारी शिष्यवृत्ती मिळाली.

     आमचे भविष्य उज्ज्वल आहे
     यशाचे शिखर धवल आहे
     आई-बाबाना अस्मान ठेंगणे आहे,
     मन हिंदोळ्यावर हेलकावत आहे.

खूप स्वप्ने पाहतोय भविष्याची
शिष्यवृत्तीवर मनोरे उभारत आहोत
पुढील शिक्षणाची सोय होऊन,
मोठे आम्ही होणार आहोत.

     अरे काय ऐकतोय आम्ही ?
     आमचा कानांवर विश्वास नाही !
     विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीय खरी,
     पण खात्यात निधीच नाही.

असेच का असते सरकार ?
असेच का असते खाते ?
जाहीर करतात शिष्यवृत्ती आधी,
नंतर हात वरती करते. 

     कोणावर विश्वास ठेवायचा आम्ही ?
     कुणावर विसंबून राहायचे आम्ही ?
     गेला कुठे निधी खजिन्यातला ?
     तडा देऊन आमच्या विश्वासाला !

अभ्यासाचे हेच फलित काय ?
भविष्य अंधारमय असेल काय ?
काहीच कळत वळत नाही,
नशिबात पुढे जाणेच नाही.

     इतर ठिकाणी नेहमीचेच आहे
     शिक्षणात पण बंडाळी माजलीय
     खात्यात तसबीर आहे सरस्वतीची,
     अशी विद्या काय उपयोगाची ?

हा निधी केव्हा मिळणार ?
आम्ही पुढे कसे जाणार ?
येथेच बांध पडतोय भविष्याला,
धरूनच चालावे आता वस्तुस्थितीला.

     विश्वास उडालाय या शिक्षणावरचा
     पुढे जायचा मार्ग खुंटलाय
     जोवर आहे खात्यात अनीती,
     भविष्याची होत राहील माती.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.
=========================================