बेवफा सजणीची बेवफाई-अशी कशी वागलीस तू ?

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 11:35:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     ऐकूया, बेवफा सजणीची बेवफाई. प्रेम निभावण्यास त्याची प्रेयसी लायक नव्हती, उलट तिचे कुणा दुसऱ्यावर प्रेम होते. प्रेमात फसलेल्या, हताश, निराश झालेल्या, आपल्या बेवफा सजणीची ही बेवफाई या प्रियकराने पुढील कवितेतून सांगितली आहे. हे दुःख सांगणाऱ्या कवितेचे शीर्षक आहे- "अशी कशी वागलीस तू ?"

                                 "अशी कशी वागलीस तू ?"
                                ------------------------

अशी कशी वागलीस तू ?
डाव उधळूनी गेलीस तू
का घेतलीस माझी परीक्षा ?
अशी मला दिलीस शिक्षा ?

     मनापासून प्रेम केले तुझ्यावर
     पण मला कळले नंतर
     एकतर्फी प्रेम होते माझे,
     अनोळखी भासले भाव नजरेचे.

तुझ्यासाठी काय नाही केले ?
असे मला फळ दिले ?
सारे जग वैरी झाले,
उत्तर याचे असे मिळाले !

     ऐकून होतो अशी बेवफाई
     ऐकून होतो प्रेमात असफलता
     वाटले नव्हते माझ्याही वाट्यास,
     येईल अशी नशिबाची कठोरता.

तुझ्यावर सारा जीव ओवाळला
तुझ्यास्तव रात्रीचा दिवस केला
प्रतारणा माझ्याशी अशी केलीस,
असा तू डाव साधलास ?

     जाताना पाठीही वळली नाहीस
     वळून शब्दही बोलली नाहीस
     आता वाटतंय चूक केली,
     प्रेमात पडण्याची भूल केली.

वफाई माझ्या नजरेत होती
बेवफाई तुझ्या मनात होती
वाटलं नव्हतं होशील दुसऱ्याची,
दुर्दशा करीत माझ्या प्रेमाची.

     तिरस्कार करतो या शब्दाचा
     वफा म्हणण्यास लायक नाहीस
     प्रेम निभावण्यास नालायक ठरलो,
     माझाच मी गुन्हेगार झालो.

तिरस्कार नाही मज प्रेमाचा
होता नुसता खेळ भातुकलीचा
अशी कशी तू वागलीस ?
माझ्या आयुष्यातून निघून गेलीस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.
=========================================