कापसाच्या गंजी झाल्यात आगीचे भक्ष

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 11:02:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कालच म्हणणे दिनांक-११.०१.२०२३-बुधवार रोजी, यु-ट्यूब ला एक बातमी ऐकली, अमरावती येथे एका कापूस कारखान्यात, ८०० किलो कापसाच्या गंजीला अचानक, अनपेक्षित आग लागून ती जाळून खाक झाली. जवळ-जवळ ६० लाखांवर नुकसान झाल्याची बातमी आहे. मित्रानो, या आगी लागतातच कश्या ? दुर्लक्ष, सुरक्षित साठा न करणे, सुरक्षा व्यवस्था कमजोर असणे, आगीपासून दूर साठा करणे, किंवा एखादा घातपात, षडयंत्र यापाठी असण्याची बरीच कारणे असू शकतात. कापूस लावण्यापासून, पीक घेण्यापासून, तो शेतात खुडण्यापासून नंतरची प्रक्रिया होण्यास जी मेहनत लागते ती सर्व फुकट गेल्यातच जमा आहे. या गंभीर विषयाची दखल घेऊन सरकारने कापूस कारखान्यांना योग्य ते सरंक्षण देऊन उपाय-योजना करावी ही विनंती. ऐकुया तर या गंभीर-वास्तव विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "कापसाच्या गंजी झाल्यात आगीचे भक्ष"

                            "कापसाच्या गंजी झाल्यात आगीचे भक्ष"
                           -----------------------------------

काय चाललंय महाराष्ट्रात हे
सत्र आगीचे सुरु आहे
सुरक्षेचा अभाव की दुर्लक्ष ?
कापसाच्या गंजी झाल्यात आगीचे भक्ष !

     अमरावती उद्योगधंद्याचे प्रमुख क्षेत्र
     कापड कारखाने येथे सर्वत्र
     कापूस लागवड अमाप येथे,
     कपाशीचे पीक भरपूर येते.

नियमित साठा कापूस कारखान्यात
गठ्ठे कापसाचे गंजीच्या रूपात
अमरावतीत भव्य बाजारपेठा उपलब्ध,
कापूस विकतोय लाखोंच्या भावात.

     अनपेक्षित घटना कानांवर आली
     कापसाच्या गंजीस आग लागली
     ८०० किलो कापूस जळून खाक,
     पाहता पाहता झाली राख.

६० लाखांवरी झाले नुकसान
कापूस मालकांचे गळाले अवसान
भारीतला भारी तोटा हा,
कापूस अग्नीत पडून झाला स्वाहा.

     काय चाललंय कळतं नाही
     सुरक्षेचा का अभाव राही ?
     सुरक्षा व्यवस्था कमजोर होई,
     की आगीवर येथे नियंत्रण नाही.

घटना राजरोस येतात कानी
नसते ध्यानी अन मनी
शेतकरी खपून कापूस पिकवितो,
अक्षरशः शेतात घाम गाळितो.

     श्रम त्याचे चाललेत वाया
     का होत नाहीत कारवाया ?
     कोणाला येथे दोष द्यायचा ?
     कोणाचा येथे रोष ओढवायचा ?

अश्या कश्या लागतात आगी ?
सुरक्षीत गोडाऊन नाहीत जागोजागी ?
अग्नी-विरोधक सूचकांची येथे,
दिसून येतेय खूपच तंगी.

     पाहणी नाही, ऑडिट नाही
     अग्नी-अवरोधकांची सर्वथा कमी राही
     सुरक्षा व्यवस्थेचे बारा वाजून,
     आग अशीच लागत राही.

अजून किती नुकसान सहावे
शेतकऱ्यांच्या श्रमास मोल मिळावे
सर्वतोपरी सुरक्षा व्यवस्था वाढवून,
झालेल्या कामाचे चीज व्हावे.

     सरकारने थोडे लक्ष घालावे
     नुकसानीचे परतावे भरून द्यावे
     सर्वात मुख्य जीवास वाचवून,
     भविष्यातले हे अपघात टाळावे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================