लाच घेऊन झालंय जीवन लाचार

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 12:42:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
   
     कालच म्हणजे, दिनांक-११.०१.२०२३-बुधवार, रोजी यु-ट्यूबला एक बातमी ऐकली, अहमदनगर मध्ये एका सरकारी कार्यालयात तेथील सरपंच आणि लिपिक या दोघांस लाच घेताना रंगे-हाथ पकडण्यात आले. मित्रांनो, हे लोक लाच का बरं घेतात ? काय असावं यापाठच कारण ? शेवटी लाच घेणं हे भ्रष्टाचारात मोडत असून वर तो गुन्हाही आहे, हे त्यांच्या लक्षात कसं येत नाही ? ऐकूया तर, या ज्वलंत-वास्तव-लाच-लुचपतीवर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "लाच घेऊन झालंय जीवन लाचार"

                              "लाच घेऊन झालंय जीवन लाचार"
                             ------------------------------

काय झालंय या मनुष्याला
नीट जेवत का नाही ?
अर्धपोटी असल्यासारखा उपाशी तो,
लाच खात का राही ?

     पगारात नीट भागत नाही
     वरचा भत्ताही मिळत नाही
     आपसूकच त्यांचा रोख मग,
     लाच खाण्यावर पुष्कळ राही.

एकाचे पाहून दुसरा खाई
व्हायरसचा प्रादुर्भाव पसरत राही
लागण याची होत राहून,
सर्व खातेच दूषित होई.

     अहमदनगर नगरी, सरकारी कार्यालयी
     वहीत याची नोंदच नाही
     अप-व्यवहार असाच होत राही,
     वरचा पैसा मिळत राही.

सरपंच अन लिपिक मिळोनी
गैर-व्यवहार सर्रास करत राहती
इतरेजनांची कामे होण्यास सुलभ,
लाच ते खात राहती.

     एके दिनी रंगे-हात पकडोनी
     आणिले त्यांस चव्हाट्यावर पोलिसांनी
     कारनामे त्यांचे उघड झाले,
     अहमदनगरीत नाव बदनाम झाले.

टेबलाखालून खाऊ, टेबलावरून खाऊ
पुस्तकातून घेऊ, खाऊच्या डब्यात ठेवू
नाना प्रकार लाच देण्या-घेण्याचे,
खाऊन वर नामा-निराळे राहू.

     भ्रष्टाचार सर्रास होतोय इथे
     मनुष्य कर्माने चाललाय रसातळास
     लाच-लुचपतीना येऊन दुप्पट वेग,
     आपल्याच दुष्कर्माने होतोय खल्लास.

प्रामाणिकपणा कुठे दिसतंच नाही
सर्व खातेच भ्रष्ट होई
हाय-फाय राहण्याचे फॅड त्यांना,
खोल खाईत ढकलत राही.

     इमान राखा, इनाम मिळावा
     सरकारने योजना सुरु करावी
     लाच घेणे तुम्ही टाळा,
     भ्रष्ट्राचाराला घाला कायमचाच आळा.

सद्सद विवेकबुद्धीने कामे करावी
सन्मार्गाचा पंथ सर्वस्वी अवलंबावा
गैर-व्यवहार, अप-व्यवहार करणे थांबवावे,
सत्शील, सदाचाराचा मार्गच स्वीकारावा.

     आपले वर्तन पवित्र राखावे
     लाच घेणे, देणे टाळावे
     खीळ बसतेय आपल्याच प्रगतीस,
     आचरणात बदल घडवून आणावेत.
     
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================