पॅच-अप आणि ब्रेक-अप

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 05:00:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


मित्र/मैत्रिणींनो,     
     
     पॅच-अप, ब्रेक-अप पुन्हा पॅच-अप, ब्रेक-अप. मित्रांनो नवीन पिढीचे, तरुणाईचे, तरुण मुलंI-मुलींचे हे काय चाललंय ? कुठून हे फॅड, ही ऍड आणि  हे याड त्यांच्या मनात भरलं गेलं ? कुठून त्यांनी हे पाहिलं ? हे सर्व ते कोणाकडून शिकले ? त्यांच्या मनात आणि डोक्यात कुणी हे भरवलं ? जास्त लांबण न लावता ऐकुया एक वास्तव-पॅच-अप, ब्रेक-अप ची, विनोदी-व्यंगात्मक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "पॅच-अप आणि ब्रेक-अप"

                               "पॅच-अप आणि ब्रेक-अप"
                              ------------------------

काय झालंय आजच्या तरुणाईला ?
कालच झालायं दोघांचा ब्रेक-अप
आज होतोय पुन्हा पॅच-अप,
उद्या होईल का परत ब्रेक-अप ?

     प्रेम म्हणजे यांना खेळ वाटला ?
     प्रेमासाठी कुणीही साथीदार निवडला
     आज एकावर जीव जडला,
     तर उद्या तोच नकोस झाला. 

पौगंडावस्थेतील त्यांचं हे वय
त्यांना प्रेमाची भाषा कळणार काय ?
एकीच्या बॉय-फ्रेंडने तिला सोडले,
तर दुसरीने त्याला वेळीच धरले.

     हीर रांझा, लैला मजनू
     फक्त इतिहासापुरतेच का जमा आहेत ?
     ते अमर प्रेम कुठे गेले ?
     प्रेमाचे हे भातुकलीचेच खेळ चाललेत !

एकावर प्रेम, तर दुसऱ्याबरोबर फिरणे
तिसऱ्याला वचने, तर चौथ्याला विवाह-स्वप्ने
हा नाही आवडला तर तो धर,
तो नाही आवडला तर हा धर.

     कुणी आणले हे फॅड
     ब्रेक-अपचे आणि पॅच-अपचे ?
     हे खूळ लागले कुठून ?
     तरुणाईला वाम-मार्गाने नेण्याचे !

याचा आदी आणि अंत काय ?
हे यांना नाही ठाऊक
या ब्रेक-अप आणि पॅच-अपच्या नादात,
यांना वाटतंय प्रेम नुसतेच घाऊक.

     याचा शेवट व्हावयास हवा
     मॅच्युरिटीचा यांच्यात शिरकाव व्हावा
     त्यांनी त्यांचे भले स्वतः ओळखावे,
     स्वतःच्या जीवनाचे हित पाहावे. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================