मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-91-प्रजासत्ताक दिन

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 10:02:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-91
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "प्रजासत्ताक दिन"

     Republic day essay in marathi : आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. वर्ष 1950 मध्ये याच दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला होता. म्हणजेच देशाची सत्ता इंग्रजांच्या हातून भारतीयांच्या हातात आली होती. आजच्या या लेखात आपण Prajasattak din Nibandh मिळवणार आहोत. हा प्रजासत्ताक दिन मराठी निबंध आपण आपल्या शाळेत वापरू शकतात.

     आपला देश भारत दीर्घकाळापर्यंत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, भारतीय स्वतंत्र सैनिकांच्या अथक परिश्रमातून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र मिळाले. व यांच्या जवळपास दीड वर्षानंतर भारताने आपली घटना लागू केली. यालाच भारताचे संविधान ही म्हटले जाते. यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखले जावू लागले. जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांनंतर भारताचे संविधान तयार झाले. व 26 जानेवारी 1950 भारतीय संसद द्वारे या संविधानाला पास करण्यात आले.

     भारतात तसेच विदेशात राहत असलेल्या भारतीयांसाठी प्रजासत्ताक दिवस साजरा करणे सन्मानाची गोष्ट आहे. या उत्सवाची तयारी एक महिना आधीच सुरू होऊन जाते. यादरम्यान दिल्लीतील इंडिया गेट जवळ लोकांचे येणे जाणे बंद करण्यात येते. यामुळे त्या दिवशी तेथे असलेल्या लोकांना सुरक्षा प्रदान होते. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील होतात. या कार्यक्रमात भारताची विविधता प्रस्तुत केली जाते. यानंतर भारतीय सैनिकांची परेड, पुरस्कार वितरण इत्यादी गोष्टी घडतात. व कार्यक्रमाच्या शेवटी शांत वातावरणात राष्ट्रगीत म्हटले जाते.

     प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी शासकीय तसेच खासगी दोन्ही क्षेत्रांना सुट्टी असतात. भारतीय लोक आपले घर, ऑफिस व गाड्यांना तिरंगी रंगाचे फुले व झेंडे लाऊन सजवतात. विविध शाळांमध्ये निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. शालेय विद्यार्थी एक महिना आधीच प्रजासत्ताक दिन भाषण तयार करून ठेवतात. या दिवशी विविध संस्था व शाळेकडून विद्यार्थ्यांना खेळ, शिक्षण व इतर क्षेत्रात चांगले प्रदर्शन केल्याबद्दल पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात येते. कुटुंबातील सदस्य या दिवशी आपले मित्र मंडळी सोबत सामाजिक स्थानांवर भेट देतात. सकाळी आठ वाजेला राजपथवर होत असलेला कार्यक्रम संपूर्ण देशात लाईव्ह दाखवला जातो.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.