प्रेम-कविता-सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 10:49:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
     
     प्रस्तुत प्रेम-कवितेतील प्रेमी आपल्या प्रेमिकेवर प्रेम करतोय. तिला ते पटवून देण्यासाठी तो नाना क्लृप्त्या लढवतोय. पाहूया अखेर त्याचे प्रेम यशस्वी होतं की नाही हे पुढील प्रेम-कवितेतून. या प्रेम-कवितेचे शीर्षक आहे- "सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी"
     
                             "सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी"
                            ---------------------------------

पाहिले तुला अवचित त्यादिनी
तेव्हापासून तुझाच ध्यास आहे मनी
तुझंच स्वप्न पडतंय ग रात्रंदिनी,
     रात्र जागून काढतोय मी अख्खी,
     सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी.

गुलाबाचे पुष्प तुला पाठविले
सोबत शुभेच्छांचे पत्रही खोवले
तुझ्या द्वारी उंबरठ्याशी ठेविले,
     सुरुवात झाली होती प्रेमाची अनोखी,
     सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी.

मोबाईलवर तुला मिस-कॉल केले
ट्विटरवर तुला ट्विटही केले
सोबत कवितांचे पत्रही लिहिले,
     आता तरी ओळख मला सखी,
     सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी.

माझे कशातही नाहीय लक्ष
दिवस भासू लागलेत मज रुक्ष
आता तरी देशील माझ्याकडे लक्ष,
     अशी करू नकोस मला दुःखी,
     सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी.

नानापरी मी तुज सांगावा धाडला
दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस केला
एकचं आस उरी कधी भेटसी मला,
     ओढ मनास तुझीच लागलीय सारखी,
     सखे, ओळख माझी प्रीत अनोळखी.

तुजवाचून अन्न लागत नाही गोड
आता तरी तुझा वृथा हट्ट सोड
मला न भेटण्याचा संकल्प तू सोड,
     मIहिताहे मला तूही पाहतेस सारखी,
     सखे, आता होऊन नकोस तू परकी,
     आता नाही राहिलीय माझी प्रीत अनोळखी. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================