मकरसंक्रांत

Started by तुतेश रिंगे ✍️, January 12, 2023, 11:43:54 PM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️

सण आला परंपरेचा
तीळ गुळ सर्वांना देण्याचा

संक्रांतीला नात्यातील गोडवा वाढतो
गोड बोलण्याने सबंध अधिक दृढ करतो

सणाला लहान मोठ्यांचा पतंगाचे खेळ चालतात
आकाशात विविध रंगांचे पतंग दिसतात

मग खेळ सुरु होतो धारधार मांजाचा
हवेत उडणाऱ्या पक्षांना मारण्याचा

सणाला माणसाच्या डोक्यावर अभिषेक होतो रक्ताचा
जीवघेणा असा खेळ हा पतंगाचा

अधिकार आहे त्यांना जगण्याचा
अधिकार आहे त्यांना स्वच्छंद हवेत उडण्याच

पक्षांना अभय द्या संक्रांतीला
तीळ गुळ देऊन मांगणे माझे ह्या सणाला
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__