श्री एकविरा आई-रोप-वे ने या तुम्ही, रोप-वे ने या !

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 11:53:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  शुक्रवार, आईचा दिवस, देवी माँचा वार. मित्रानो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कार्ला लेणी, आणि लोणावळा यांना जोडून असलेल्या डोंगरावर माता एकविरा आईचे स्थान आहे. डोंगराची वाट अतिशय बिकट असून, आईचे दर्शन मिळताच आपला सारा थकवा क्षणार्धात दूर होतो. कोळ्यांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकविरा मातेस माझा मनापासून नमस्कार. मित्रानो, यंदाचं सरकारने आईचे दर्शन सुलभ होण्यास, आणि सर्व लहान-थोर भाविकांनाही आईचे दर्शन मिळण्यास डोंगरावर रोप-वेचे आयोजन केल्याची बातमी कळली. पाहूया, ही योजना कधी मूर्त स्वरूप घेते ती. ऐकुया या विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "रोप-वे ने या तुम्ही, रोप-वे ने या !"

                             "रोप-वे ने या तुम्ही, रोप-वे ने या !"
                            --------------------------------

एकविरा आईचे दर्शन घ्या,
रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

एकविरा आईचे दर्शन घ्या,
रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

एकविरा मातेचे डोंगरावर स्थान
मूर्तीरुपी आई तेथे आहे विराजमान
दर्शनास जाती सारे थोर-लहान
सोहळा आईचा दिसतोय छान,
     आईच्या प्रसादाचा लाभ तुम्ही घ्या,
     रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

आईच्या डोंगराची वाट बिकट
चढतानाही दमतात धड-धाकट
आईच्या डोंगराची वाट ही वाकडी
चढताना थकतात माणसे ही तगडी,
     साऱ्यांचाच प्रवास सुखात व्हाया ,
     रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

आईच्या दर्शनास जमतात सारी
प्रत्येक दिवसाला प्रत्येक वारी
डोंगर माथ्यावर झाली हो गर्दी
दर्शनाची आस उरलीय अर्धी,
     दर्शना आईच्या रांगेतून या,
     रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

आईचा प्रताप मनी ठसवावा
आईचा वरद शिरी बाळगावा
आईचा प्रसाद भक्षण करावा,
     नित्य वारीला तुम्ही आईच्या या,
     रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

सरकारची भावी नामी योजना
आकर्षित करील साऱ्या भाविकांना
प्रवासात हिरवाईचा आनंद घ्या ना,
अनोखा अनुभव गाठीशी बांधा ना,
     सुलभ, सुकर प्रवासाची मजा लुटुया,
     रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

मातेचे दर्शना सहजी मिळेल
वाट ही बिकट सुलभ होईल
घाई-गर्दीला आता नाही थारा,
रीघच लागेल आईच्या द्वारा,
     भक्तांनो उत्तम दर्शना मिळाया,
     रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

एकविरा आईचे दर्शन घ्या,
रोप-वे ने या तुम्ही रोप-वे ने या !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.
=========================================