दारूची करतात पार्टी, वीज कार्यालयातली कार्टी

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 04:10:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     बुधवार दिनांक-११.०१.२०२३, एक बातमी यु-ट्यूब ला पाहीली की, यवतमाळ येथे एका वीज कार्यालयात, वीज कर्मचाऱ्यांची चक्क दारू-पार्टी सुरु होती. अगदी त्याचवेळी वीज अभियंत्यांनी स्टिंग ऑपरेशन करून त्यांचा भाण्डाफोड केला, व त्यांचे हे पराक्रम उघडकीस आणले. ऐकुया या विषयावर एक वास्तव-वादी,व्यंगात्मक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "दारूची करतात पार्टी, वीज कार्यालयातली कार्टी" 

                     "दारूची करतात पार्टी, वीज कार्यालयातली कार्टी"
                    -------------------------------------------

काय चाललंय सरकारी कार्यालयात
काय चाललंय सरकारी दफ्तरात
रिफ्रेश होण्यास करतात कर्मचारी,
चक्क दारूची पार्टी ऑफिसात ?

     कामाचा व्याप खूप असतो
     धोकाही येथे गंभीर असतो
     वीज खाते अति सेन्सिटिव्ह,
     असावे लागते सदैव ऍक्टिव्ह.

यवतमाळ शहरी, वीज कार्यालयी
रंगलीय चक्क दारूची पार्टी
टेबलावरच्या वह्या दूर सारुनी,
पार्टी करताहेत कर्मचारी कार्टी.

     ग्लास भरताहेत, चखणा चाखताहेत
     चिअर्स करताहेत, गाणी गाताहेत
     सारे जण नशेत आहेत,
     सारे जण बिनधास्त आहेत.

कसं दृश्य दिसतंय हे ?
जिथे काम तिथेच हे ?
मोबाईल पाहायचा, गाणी ऐकायची,
नॅप घ्यायची, गप्पा मारायची.

     कुठे वाहत चाललीय संस्कृती ?
     हेच मिळालेत काय संस्कार ?
     याना दुसरे ठिकाण नाही ?
     चक्क दारूची पार्टी होई !

खबर लागलीय वीज अभियंत्यांना
सुरुवात केलीय स्टिंग ऑपरेशनना
रंगे हात पकडलंय तळीरामांना,
दारू पिऊन झुलताना, झिंगताना.

     पराक्रम त्यांचे उघडे केलेत
     अभियंत्यांनी उत्तम पराक्रम केलेत
     दारुड्याना चांगलीच अद्दल घडवून,
     वर बडतर्फीचे आदेशही दिलेत. 

वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच तंतरलीय
आपल्या चुकांची जाणीव झालीय
पुढे असं होणार नाही,
याची मनोमन प्रतिज्ञा केलीय.

     अभियंत्यांचे खूप स्वागत झालेय
     गैर-वर्तन ऑफिसातील उघडकीस आणलेय
     अश्याच प्रामाणिक अभियंत्याची आज,
     देशाला जास्त आहे गरज.

असं कधीही घडू नये
ऑफिसात ऑफीसचेच काम व्हावे
बार पडलेत कितीतरी मोकळे,
ऑफिसचे नाव खराब न करावे.

     पार्टीच्या वेळी पार्टी करावी
     प्रथम प्रामाणिकपणे नोकरी करावी
     कार्यालयात फक्त कामच व्हावे,
     विवेक-बुद्धी नेहमीच शाबूत ठेवावी. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.
=========================================