१३-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 09:48:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१३.०१.२०२३-शुक्रवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१३-जानेवारी-दिनविशेष"
                                 -----------------------


-: दिनविशेष :-
१३ जानेवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००७
के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६
पुणे - मुंबई दरम्यान 'शताब्दी एक्सप्रेस' सुरू झाली.
१९६७
पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
१९६४
कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
१९५७
हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
१९५३
मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी
१८९९
गोविन्द बल्लाळ देवल यांच्या 'संगीत शारदा' या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८३
इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार
१९८२
कमरान अकमल
कमरान अकमल – पाकिस्तानी यष्टीरक्षक आणि फलंदाज
१९४९
राकेश शर्मा
विंग कमांडर राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
१९३८
पं. शिवकुमार शर्मा
पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार
१९२६
शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
(मृत्यू: ९ एप्रिल २००९)
१९१९
एम. चेन्‍ना रेड्डी – (अविभाजित) आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६)
(मृत्यू: २ डिसेंबर १९९६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१३
रुसी सुरती – क्रिकेटपटू
(जन्म: २५ मे १९३६)
२०११
प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते
(जन्म: १४ मार्च १९३१)
२००१
श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे 'मेघदूत' कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत' यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.
(जन्म: ? ? ????)
१९९८
शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)
१९९७
मल्हार सदाशिव तथा 'बाबूराव' पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक
(जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९८५
मदन पुरी
मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता
(जन्म: ३० सप्टेंबर १९१५ - लाहोर, पाकिस्तान )
१९७६
अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक
(जन्म: ? ? १८९२?)
१८३२
थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक
(जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.