मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-92-प्रजासत्ताक दिन

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 10:07:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-92
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "प्रजासत्ताक दिन"

     प्रजासत्ताक दिन भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे. हा दिवस भारत प्रजासत्ताक झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या दिवशी स्वतंत्र भारताची नवीन राज्य घटना लागू करण्यात आली. हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय घटनेनुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. या निर्णयानंतर देशभरात आनंद साजरा केला गेला. व तेव्हापासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

     26 जानेवारीचा हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा दिवस आहे. यादिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, कॉलेज, कार्यालय तसेच सर्वच प्रमुख स्थानांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो. शालेय मुले या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकनृत्य, लोकगीत, राष्ट्रगीत इत्यादी सादर केले जातात.

     प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्ली येथे होतो. या दिवशी देशाच्या विजय चौक वर मंच स्थापन करण्यात येतो. या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती येऊन तिरंगा फडकवतात. यांनतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येते. भारतीय सेनेद्वारे आपली सैन्य शक्तीचे प्रदर्शन केले जाते. सैनिकांच्या परेड होतात. ही परेड पाहण्यासाठी राष्ट्रपती सोबत, नेता व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. बऱ्याचदा या दिवशी इतर देशांच्या पंतप्रधानांना अतिथी म्हणून बोलावण्यात येते.

     प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण केले जाते. हजारो व लाखो लोकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस इत्यादी अनेक महान नेत्यांनी आपले संपूर्ण जीवन लावले. यांनी भारतीयांसमोर एक आदर्श निर्माण केला. आपला देश या महान स्वतंत्र सैनिकामुळेच कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत एक आहे.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.