शृंगारिक-प्रेम-कविता-तुझ्याचसाठी बाई मी सारा श्रुंगार केला

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 11:00:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया एक शृंगारिक-प्रेम-कविता. प्रस्तुत कवितेतील प्रेमिका आपल्या प्रियाचे मन रिझविण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी, त्याला मिळविण्यासाठी काय काय करते, हे मी पुढील कवितेतून तुम्हांपुढे मांडले आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे- "तुझ्याचसाठी बाई मी सारा श्रुंगार केला"     

                            "तुझ्याचसाठी बाई मी सारा श्रुंगार केला"
                           -----------------------------------

तुझ्याचसाठी बाई मी सारा श्रुंगार केला
तुझ्याचसाठी बाई मी सारा नखरा गेला
तू दिसता, पदराआड मी चेहरा लपविला
लाज लाजुनी चूर होतI, एक कटाक्ष टाकला,
     भावला तुझा रुबाबी रुपडा, 
     आवडला तुझा राजबिंडा मुखडा.

यौवनात मी आहे आज, आरसा सांगून गेला
दृष्ट काढली मीच माझी, पाहून स्वतःला
तुजसारखी नाही सुंदर, समजाविले मजला,
     आवडलास तू मर्दानी रांगडा,
     भावलास मज मर्द तू तगडा.

लक्ष तुझे वेधण्या, माझी झुलली कटी-मेखला
सुवर्ण मोहन-माळ माझ्या वक्ष-स्थळी रुळला
माझ्या नजरेचा बाण मी तुजवरी अवचित सोडला,
     भावला तुझा स्वभाव भाबडा,
     तूच माझा कृष्ण ठकडा.

तुझ्या दिलात माझा नयन-बाण असा रुतला
मोहित झालास माझ्या दिल-खेचक अदेला
पाहता मजभोवती तुझा गोंडा घोळू लागला,
      आवडली तुझी मज लाडी-गोडी,
      भावली तुझी मज मिठी रांगडी.     

प्रेमाचे शिखर आज दूर नाहीय मला
हवे होते ते आज मिळाले मजला
तुला मिळवून आज मी जिंकले जगाला
तुझ्यात हरवून बसले मी स्वतःला,
     प्रीत माझी नाहीय बेगडी,
     तूच प्रियकर, तूच माझा सवंगडी.

तुझ्याचसाठी बाई मी सारा श्रुंगार केला,
तुझ्याचसाठी बाई मी सारा नखरा गेला.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.
=========================================