प्रेम-गीत-तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज

Started by Atul Kaviraje, January 14, 2023, 12:36:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम-गीत ऐकवितो. "तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही शनिवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त)
-----------------------------------------------------------

                    "तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज"
                   -----------------------------------------------

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे, तू विशेष आहेस मज.

माझी प्रीया तू, तू माझीच आहेस
माझ्या मनाची, तू राणी आहेस
तुझ्या प्रीतीचा, गंध दरवळतो
तुझ्या प्रेमात, मी विरघळतो,
     माझा मग, मीच राहत नाही,
     माझा मग, मीच उरत नाही.

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे , तू विशेष आहेस मज.

तुझ्या प्रेमाने, बघ जादू केली
तुझ्या प्रितीने, मज मोहिनी घातली
गंध तुझा हा, मज आवडला
स्पर्श तुझा मज, सांगून गेला,
     तुझ्या मिठीत, सारा रागही गेला,
     तुझ्या मिठीत, अनुराग मिळाला.

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे , तू विशेष आहेस मज.

तुझ्या भोवती, फिरू लागलो
प्रीत फुलाचा मी, भुंगा झालो
मध प्राशीण्या, तुझ्यात दडलो
तुझ्या प्रेम-पाशात, मी अडकलो,
     मधुरस बघ माझ्या, देही घोळला,
     प्रीत-रसाने, जीव तुझ्यात रूळला.

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे , तू विशेष आहेस मज.

वाणी तुझी मज, गोड भासली   
हास्याने तुझ्या बघ, धुंदी आली
नजरेने तुझ्या, जणू फुले उधळली
अदा तुझी मज, खूप आवडली,
     सखे तुझ्यावर, जीवच जडला,
     हा दास बघ, तुझाच झाला.

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे , तू विशेष आहेस मज.

क्षणही भासे मज, किती जन्माचा
परिचय आहे जणू, जन्मोजन्मीचा
तुला मिळवुनी, मी धन्य झालो
संचय आहे, माझ्या पुण्याईचा,
     नशिबाची साथ, आहे मजला,
     तुझ्यासवे प्रिये मज, स्वर्गच लाभला.

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे , तू विशेष आहेस मज.

तुझ्या प्राप्तीने, मी सुखावलो 
तुझ्या प्रितीने, मी बघ घडलो
नशीब माझे, तुज मी आवडलो
तुझ्या हृदयाचा, राजा मी झालो,
     अर्थ आला मग, मम् जीवनाला,
     सारे श्रेय बघ, जातंय तुजला.

तू खासच आहेस प्रिये अनुपमे, तू खासच आहेस मज,
तू औरच आहेस प्रिये अनुराधे , तू विशेष आहेस मज.
     
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2023-शनिवार.
------------------------------------

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================